नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मनुफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) संघटनेच्या अध्यक्षपदी आशिष नहार यांची निवड करण्यात आली. आज अध्यक्ष निवडीची कार्यकारणीची बैठक निमा हाऊस सातपूर येथे झाली. यावेळी सर्वानुमते आशिष नहार यांची अध्यक्षपदी २०२५ सालासाठी निवड करण्यात आली.
या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष नहार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, निमाचे सर्व पदाधिकारी, सभासद, संलग्न औद्योगिक व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन उद्योजकांच्या व नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असून सर्वोतपरी प्रयत्न करु, यावेळी त्यांनी येत्या आठवड्यात सर्व कार्यकारिणीच्या पदाधिकारींची निवड समित्या स्थापन करणार असल्याचेही सांगितले.
या बैठकीत मावळते अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थीत होते. या बैठकीनंतर माजी अध्यक्ष महेंद्रभाई कोठारी, अभय कुलकर्णी, विवेक गोगटे, रमेश वैश्य , मधुकर ब्राह्मणकर, नरेंद्र हिरावत, मनिष कोठारींसह महाराष्ट्र चेंबर माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा आदींसह अनेक उद्योजकांनी नहार यांचे अभिनंदन केले.
