नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल चोरट्याकडून पोलिसांनी ५० हजार रूपये किमतीचे बारा मोबाईल हस्तगत केले आहे. इम्राण हनिफ पठाण (२९ रा.विनयनगर) असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. जुने नाशिक परिसरात देवळाली कॅम्प येथील भागचंद गणेश लध्दड या रिक्षाचालकाचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पोबारा केला होता. ही घटना गेल्या शुक्रवारी घडली होती.
याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक किशोर खांडवी यांना खब-या कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताच्या मुसक्या आवळल्या असता त्याने रिक्षाचालकासह याच भागात अनेकांचे मोबाईल हिसकावून पोबारा केल्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून सुमारे ४७ हजार ७०० रूपये किमतीचे बारा मोबाईल हस्तगत केले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार व दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक खांडवी,उपनिरीक्षक भुषण देवरे,पोलिस नाईक संदिप शेळके,विशाल काठे शामकांत पाटील व संजय पोटींदे आदींच्या पथकाने केली.