शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आश्रम शाळेत आता कंत्राटी परिचारकेमार्फत सेवा…नाशिकमध्ये ३४० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण

by Gautam Sancheti
जून 10, 2025 | 7:34 am
in स्थानिक बातम्या
0
Untitled 27

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक व ठाणे जिल्हा मधील शासकीय आश्रमशाळा येथे नवं नियुक्त कंत्राटी परिचारिका यांचा पायाभूत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
त्याचे उद्घाटन आदिवासी विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, उपायुक्त शशिकला आहेरराव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ कपिल आहेर, प्राचार्य डॉ दावल साळवे, साथरोग शास्त्रज्ञ डॉ गणेश शिंदे ,डॉ पंकज ठाकरे, वैद्यकीय अधिकारी गलगंड डॉ प्रतिभा पाटील, वैद्यकीय अधिकारी डी टी टि डॉ कैलास भोये इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी आश्रम शाळेमध्ये मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निवासी परिचारिका असावी यासाठी विशेष प्रयत्न केले आणि या नावीन्यपूर्ण उपक्रमास सुरुवात झाली. यापुढे उपस्थित प्रशिक्षणार्थींना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून चांगल्या प्रकारे आश्रम शाळेतील कामकाज हे समजून घेऊन मुलांच्या आरोग्याचे रक्षण आपण करावे, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन याप्रसंगी केले.

शासनामार्फत आदिवासी विभागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी निवासी आश्रम शाळा चालविल्या जातात त्यामध्ये निवासी आश्रम शाळांमध्ये मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नवनियुक्त परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी या प्रकारे आरोग्य परिचारिका आरोग्य सेवा देणार आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे पायाभूत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक ९ जून ते २५ जून या दरम्यान एकूण नऊ बॅचेसचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

यामध्ये विविध आजाराच्या विषयांची तोंड ओळख ,उपचार, संदर्भ सेवा तसेच मुलांचे हक्क, कर्तव्य, किशोरवयीन अवस्था, पाणी शुद्धीकरण, साथरोग, स्वच्छता, अशा विविध अंगी विषयांवर त्यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रत्येक बॅच ही तीन दिवस निवासी घेण्यात येणार आहे. यामध्ये विविध विषयांचे तज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार असून आश्रम शाळेत राहणाऱ्या बालकांचे आरोग्य तसेच अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणाने होणारे मृत्यू टाळण्यासाठी तसेच भविष्यातील पिढी चांगली घडविण्यासाठी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम पूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. नाशिक व ठाणे जिल्ह्यातील आश्रम शाळेत नवनियुक्त होणाऱ्या परिचारिका यांचे प्रशिक्षण नाशिक येथे होत असून आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण सुरू करण्यात आले एकूण ३४० प्रशिक्षणार्थी परिचारिका यामध्ये सहभागी होणार आहे. संपूर्ण प्रशिक्षणाचे नियोजन हे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक व आदिवासी आयुक्तालय नाशिक यांचे मार्फत आयोजित करण्यात आले आहे .

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिओब्लॅकरॉकने केली आपल्या टॉप लीडरशिप टीमची घोषणा…गौरव नागोरी यांची COO म्हणून नियुक्ती

Next Post

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम आता राज्यात…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Pne DIO Photo Hon. Revenue Minister Lokadalat 9 June 2025 2

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम आता राज्यात…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011