अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आषाढी एकादशी निमित्त आज सकाळी येवला तालुक्यातून मा. आमदार नरेंद्रभाऊ दराडे आणि मा. आमदार किशोरभाऊ दराडे, कुणाल दराडे फाउंडेशन, येवला यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाण्यासाठी वारकरी भाविक भक्तांना मोफत २२ ते २५ बस सुविधा पुरवून वारीची सोय करण्यात आली. प्रत्येक बस मध्ये स्वतंत्र तज्ञ डॉक्टरची सुविधा देण्यात आली आहे. सकाळी स्वतः आमदार दराडे बंधूनी व कुणाल दराडे तसेच सौ मीनाताई दराडे यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले तसेच त्या ठिकाणी राहण्याची, जेवण व फराळाची आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याचे अध्यक्ष कुणाल दराडे यांनी सांगितले.
याच सोबत वारकरी भाविक भक्तांसाठी प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर, औषधोपचाराचीही व्यवस्था मातोश्री आसराबाई दराडे मठ टेंभुर्णी रोड, गुरसाळे, पंढरपुर, जि. सोलापूर येथे करण्यात आली असून यापुढे ही सेवा तालुक्यातील भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार किशोर दराडे यांनी सांगितले. येवला-लासलगाव मतदारसंघातील सर्व वारकरी भक्तांनी या विनामूल्य सेवेचा लाभ घ्यावा व सर्व वारकरी मंडळींनि पंढरीचा राजाचे दर्शन घ्यावे असे आवाहन आमदार नरेंद्र दराडे यांनी केले आहे. यावेळी दराडे पेट्रोल पंप येथे अनिल महाराज यांचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मा. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, संजय कासार, डॉ सुधीर जाधव, देविदास निकम,दिनेश आव्हाड,नितीन काबरा, सुनील पवार, मा नगरसेवक, तसेच कुणाल दराडे फौंडेशन चे सर्व सदस्य उपस्थीत होते.