नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गायलेल्या प्रसिद्ध मराठी हिंदी गाण्यांची मैफिल “आशा ही आशा” रविवार दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, विशाखा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या मैफिलीच्या सादरकर्त्या नाशिकच्या प्रसिद्ध गायिका रागिणी कामतीकर या आहेत. त्यांना साथसंगत प्रशांत महाले, अनोश आढाव, अभिजीत शर्मा, महेश कुलकर्णी, गौरव तांबे व महेंद्र फुलफगर हे कलावंत करणार असून कार्यक्रमाचे निवेदन डॉक्टर स्मिता मालपुरे या करणार आहेत.
कार्यक्रमासाठी ध्वनीव्यवस्था सचिन तिडके यांची आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.