मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एआयएमआयएम पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्हायरल व्हिडीओ क्लिप शेअर करुन भाजपवर टीका केली आहे. ओवैसींनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, हा दहशतवादी हल्ला आहे ज्यात विशेषतः मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या सातत्याने मुस्लिमविरोधी, चितावणीखोर भाषणांचे हे परिणाम आहेत. आरोपी आरपीएफ जवान हा भाजपाचा भावी उमेदवार होईल का? त्याच्या जामिनाला सरकारचा पाठिंबा असेल का? सुटल्यावर त्याला हार घातले जातील का? मी जर चुकीचा ठरलो तर आनंद होईल.
व्हायरल झालेल्या व्हि़डिओ क्लीपमध्ये आरोपीचं चेतन सिंह रेल्वेमध्ये इतर लोकांना धमकावत असतानाचा आहे. यात तो म्हणतोय, अगर वोट देना है, हिंदुस्थान में रहना है तो मोदी और योगी को दो, और आपके ठाकरे… तो पुढे काय बोलला ते व्हिडीओत स्पष्ट ऐकू येत नाही. या व्हायरल व्हिडीओ क्लिपवरुन एआयएमआयएम पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर टीका केली आहे.
जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात अगोदर हे घडले, हे आहे कारण
मुंबई – पालघरमध्ये जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढताना एका RPF कॉन्स्टेबलने त्याच्या वरिष्ठ ASI वर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर तो मानसिक आजारी असल्याचे समोर आले आहे. गोळीबार अगोदर त्याला आराम करण्याचा सल्लाही या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या एएसआय टीकामराम मीणा यांनी दिल्याचे बोलले जात आहे. या घटनेत गोळी लागल्याने एएसआय आणि अन्य ३ प्रवाशांचा मृत्यू झाला. चेतन सिंह नावाच्या आरफीएफ हवालदाराने गोळीबार केला. ज्याला पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली आहे. या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे.
ही घटना सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. अगोदर चेतने सिंह याने एएसआय टीकामराम मीणा यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याने तीन प्रवाशांवर गोळी झाडली. रेल्वेच्या B 5 कोचमध्ये हा गोळीबार झाला. गोळीबारात गोळी लागल्याने ४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरपीएफ कॉन्स्टेबल आणि त्याचा वरिष्ठ एएसआय यांच्यात काही मुद्द्यावरून बाचाबाची आणि वाद झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे रागाच्या भरात हवालदाराने गोळीबार केल्याचे बोलले जात होते. पण, आता तो मानसिक आजारी आल्याचे समोर आले आहे. दहिसर परिसरात पालघर ते मुंबई दरम्यान रेल्वेवर हा गोळीबार झाला.
मुंबईतील डीआरएम नीरज वर्मा यांनी सांगितले की, सकाळी ६ च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की आरपीएफ जवानाने गोळीबार केला, ज्यामध्ये चार जण ठार झाले. आरोपी हवालदार एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होता. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना भरपाई जाहीर केली जाईल.
पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ म्हणाले की, ‘आज मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन कुमारने त्याचा सहकारी एएसआय टिकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला. यादरम्यान अन्य तीन प्रवाशांनाही गोळ्या लागल्या. प्राथमिक तपासात आरोपीने आपल्या सर्व्हिसच्या शस्त्रानेच गोळीबार केल्याचे समोर आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गोळीबारात शहीद झालेल्या RPF ASI टिकाराम मीणा यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने एक निवेदन जारी केली आहे. पश्चिम रेल्वेने सांगितले आहे की दिवंगत ASI च्या नातेवाईकांना रेल्वे सुरक्षा कल्याण निधीतून १५ लाख रुपये, मृत्यू किंवा सेवानिवृत्ती निधीतून १५ लाख रुपये दिले जातील. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना अंतिम संस्कारासाठी २० हजार रुपये आणि विमा योजनेअंतर्गत ६५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.