मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान अखेर तुरुंगाबाहेर आला आहे. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात गेल्या २६ दिवसांपासून तो तुरुंगात होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज त्याच्या तुरुंगातून बाहेर येण्याची वाट त्याचे कुटुंबिय पाहत होते. मात्र, त्यास यश येत नव्हते. अखेर आज सकाळी त्याची सुटका झाली आहे.
आर्यन खानचा जामीन अर्ज मंजूर व्हावा यासाठी शाहरुख खानने उच्च न्यायालयात दिग्गज वकीलांची फौज उभी केली. त्यांनी जोरदार युक्तीवाद केल्यामुळेच न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आर्यन आता बाहेर येणार आहे. यासाठी अभिनेत्री जुही चावला ही जामीनदार राहिली आहे. तिने यासाठी १ लाख रुपये न्यायालयात भरले आहेत. दरम्यान, आर्यनची तुरुंगातून सुटका होताच शाहरुखचे निवासस्थान असलेल्या मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांनी जल्लोष केला. एकप्रकारे शाहरुखच्या चाहत्यांनी दिवाळीच साजरी केली. मन्नत बंगल्याला रोषणाई करण्यात आली आहे. मन्नतबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी आहे. आर्यन तुरुंगाबाहेर आल्याचे वृत्त समजताच चाहत्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष केला.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1454320332244799497