मुंबई – प्रत्येक पालकाला म्हणजेच आई-वडिलांना आपल्या मुलाच्या भविष्याची आणि भवितव्याची चिंता असते, आपला मुलगा चांगल्या मार्गाला लागावा आणि त्याने नावलौकिक मिळवावा, असे प्रत्येकालाच वाटते. परंतु काही वेळा बड्या बापाची मुले कुमार्गाला लागू शकतात, परंतु त्यांना पुन्हा सदमार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी आता स्पेशल ट्रेनिंग कोर्स देखील आहेत.
किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दि. ३ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझमधून अटक केली होती. कारण आर्यन खानवर त्याच्या मित्रांसोबत ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप होता. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना एनसीबीने अटक केली होती. सध्या या प्रकरणात आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली आहे.
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळून जवळपास एक महिना उलटला आहे. दरम्यान, त्यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक बातम्या येत होत्या. आता आर्यन खानचे आयुष्य पुन्हा रुळावर आणण्यासाठी शाहरुख-गौरी अजूनही त्याला आपल्या देखरेखीखाली ठेवत आहेत. परंतु आर्यन खान लवकरच बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लाइफ कोच अरफीन खानच्या लाइफ सेशनमध्ये सामील होणार आहे.
आर्यन खान लवकरच अरफीन खानला भेटणार आहे. यापुर्वी सुजैन खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक रोशन हा अरफीनकडे गेला होता. अरफीनच्या सत्रात सामील झाल्यानंतर हळूहळू हृतिक रोशनचे आयुष्यही रुळावर येऊ लागले. तर आता जामीन मिळाल्यानंतर आर्यन खान आपल्या घरात नजर कैद झाला आहे. तसेच दर शुक्रवारीच आर्यन एनसीबी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडतो. आर्यन खानला वाढदिवसाच्या दिवशीही एनसीबी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता त्याला पुन्हा चांगले आयुष्य जगायचे असून गरिबांची सेवा करायची आहे, असे सांगण्यात येते.