मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आर्यनसह अरबाझ, मुनमुन यांनासुद्धा कोठडीतच राहावे लागणार आहे. जामीन फेटाळल्यानंतर सर्व आरोपींना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात येत्या तीन ते पाच दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. आर्यनचे वकील सत्र न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.
आर्यनसह इतर आरोपींना एक रात्र एनसीबीच्या कार्यालयात काढली. जे. जे. रुग्णालयात तपासणी करून त्यांना आर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले. मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला तुरुंगात पाठवण्यात आले. आर्यनच्या जामिनावर शुक्रवारी मुंबईतील किल्ला न्यायालयात सुनावणी झाली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा आणि जामीन देण्याचा अधिकार सत्र न्यायालयाचा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. आर्यनचे वकील मानेशिंदे आता सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करू शकतात. आर्यनसह आठ जणांचा जामीन फेटाळ्याने त्यांना कोठडीत राहावे लागणार आहे.