मुंबई – क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात तुरुंगामध्ये असलेल्या आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी अभिनेता शाहरुख खान आक्रमक झाला आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या पार्श्वभूमीवर शाहरुखने तिसऱ्या दिग्गज वकिलाची नियुक्ती केली आहे. माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे आता उच्च न्यायालयात युक्तीवाद करणार आहेत. थोड्याच वेळात न्यायालयात सुनावणी होणार आहे.
आर्यनला कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळायला हवा, अशी आग्रही मागणी शाहरुखने तिन्ही वकीलांकडे केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यात आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. तसेच, ३० ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने जाहीर केले होते. न्यायालयाला दिवाळी सुट्या लागण्यापूर्वीच आर्यनला जामीन मिळावा यासाठी शाहरुख आग्रही आहे. जर आता जामीन मिळाला नाही तर आर्यनला दिवाळीही तुरुंगात काढावी लागणार आहे. गेल्या २० हून अधिक दिवसांपासून आर्यन तुरुंगात आहे. आता आर्यनच्या जामीनासाठी तब्बल तीन दिग्गज वकील न्यायालयात बाजू मांडणार असून जामीन मंजूर केला जाणार की फेटाळला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/ANI/status/1452851962202914816