मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याच्या नशिबी तारीख पे तारीख असल्याचे दिसून येत आहे. खासकरुन हा डायलॉग सिनेमामध्ये बघायला मिळतो. मात्र, क्रूझ ड्रग प्रकरणात आर्यनच्या बाबतीत तसेच निदर्शनास येत आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. पण, यासंदर्भात न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आता याप्रकरणी न्यायलयात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणा आर्यन गेल्या २० दिवासंपासून तुरुंगात आहे. त्याला कुठलाही दिलासा मिळताना दिसत नाही. त्यामुळे त्याचे वडिल शाहरुख हे सुद्धा कासावीस झाले आहेत. म्हणूनच त्यांनी आता उच्च न्यायालयात तब्बल तीन दिग्गज वकीलांची फौज उभी केली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून आर्यनच्या जामीनावर सुनावणी सुरू आहे. मात्र, त्याला दिलासा मिळू शकलेला नाही. उच्च न्यायलयाने कालच्या सुनावणीत एका बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. आज दुसऱ्या बाजूचा युक्तीवाद ऐकून घेण्यात आला आहे. मात्र, आज निकाल दिलेला नाही. तर, उद्या गुरुवारी (२८ ऑक्टोबर) जामीन अर्जावर न्यायालय निकाल देणार आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1453330324390170626