इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आज मी जनतेला विचारण्यासाठी आलो आहे की, तुम्ही केजरीवाल यांना प्रामाणिक मानता की गुन्हेगार? आता जोपर्यंत दिल्लीची जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. आजपासून दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन अशी घोषणा आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर त्यांनी आज जाहीर सभेत ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, मला तुरुंगात पाठवून ते आमचा पक्ष फोडतील, असे भाजपला वाटत होते. आमचे आमदार फोडून ते दिल्ली आणि पंजाबमधील सरकार पाडतील. पण, ते काही करु शकले नाही. त्यांच्या कारस्थानांविरुद्ध आम आदमी पार्टी लढत आहे. ते माझे मनोधैर्य खचतील असे त्यांना वाटत होते पण त्यांनी माझे मनोबल आणखी वाढवले आहे.