इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीतील दारु घोटाळ्याशी संबधित मनी लॅान्ड्रिंग प्रकरणात सीबीआयने नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा जामीन मंजूर करतांना न्यायाधीस भुइया यांनी सीबीआयव टिप्पणी केली आहे.सीबीआयची पिंज-यातील बंद पोपटाची जी प्रतिमा आहे त्यातून मुक्त झालं पाहिजे असे म्हटले आहे. निष्पक्ष तपास झाला नाही, ही धारणा बदलली पाहिजे असेही ते म्हणाले.
हा जामीन मिळाल्यानंतर आपचे खासदार संदीप पाठक म्हणाले की, हा देशासाठी ऐतिहासिक निर्णय आहे. देशाच्या घटनेवर कोणीही आणि कोणतीही हुकूमशाही पाळू शकत नाही हे सत्य सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे. आम्ही सर्व आनंदी आहोत… हे एक प्रकारे अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक आहे. ज्या संस्थेची प्राथमिक जबाबदारी संविधान आणि लोकशाही तत्त्वांचे रक्षण करणे आणि कायद्याने घालून दिलेल्या मानक प्रोटोकॉल आणि प्रक्रियांचे पालन करणे आहे, ते करण्याऐवजी ते आपल्या राजकीय स्वामींच्या सूचना घेऊन पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटासारखे वागत आहेत. SC ने हे हायलाइट केले आणि त्यांना असे वागू नका असे स्पष्टपणे सांगितले.
हा जामीन मिळाल्यानंतर आपने जोरदार जल्लोष साजरा केला. केजरीवाल यांच्या पत्नी यांनी मिठाई वाटप करत या निर्णयाचे स्वागत केले.