इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या त्यातही महिला वर्गाच्या अत्यंत जवळच्या असतात. त्यातही काही वेगळ्या वाटेवरच्या मालिका तर फारच लोकप्रिय होतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका याच पठडीतली. विषयाच्या वेगळेपणामुळे अल्पावधीत ही मालिका लोकप्रिय ठरली.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सुरवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आजही प्रेक्षक या मालिकेवर तेवढंच प्रेम करतात. त्यामुळेच ही मालिका टीआरपीमध्ये कायम अग्रेसर असते. गृहिणी म्हणून सुरु झालेला अरुंधतीचा प्रवास आज तिला यशाच्या शिखरावर घेऊन गेला आहे. तिच्या या प्रवासादरम्यान या मालिकेत अनेक वळणे आली. आता पुढे काय होणार ही प्रेक्षकांची उत्सुकता कायम ताणली गेली. सध्या या मालिकेत मध्यवर्ती अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर दिसत नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. तिने ही मालिका सोडल्याचीही चर्चा आहे. आता अरुंधतीनेच यावर मौन सोडत आपण दिसत नसल्याचा उलगडा केला आहे.
https://twitter.com/StarPravah/status/1588463843453571072?s=20&t=_iJE3v2SsysTJzGxulUUnQ
मधुराणी प्रभुलकर हे नाव आज घराघरात प्रसिद्ध आहे. मधुराणी हे अष्टपैलू कलाकार आहे. अभिनेत्री, कवयित्री, गायिका, संगीतकार, दिग्दर्शक यासह अनेकांना अभिनय शिकवणारी मधुराणी हिला ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे एक वेगळीच लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी अरुंधतीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत मालिकेत तिच्या अनुपस्थित असण्यामागचे कारण सांगितले. मधुराणी प्रभुलकर हिने आठवड्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने मालिकेत न झळकण्याबद्दल स्पष्टीकरण दिले होते. “माझी एक छोटी सर्जरी झाली असल्या कारणाने मालिकेतूनही काही दिवसांची रजा मागून घेऊन मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे आणि लवकरच की मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन, असे तिने यात म्हटले होते. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरलही झाली होती.”
सततच्या वेगळ्या वळणांमुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. संजना आणि अनिरुद्धमध्ये निर्मण झालेले वाद, अनिरुद्धचे सनकी वागणे हे सुरूच असताना. मालिकेतील प्रेमाचा बहर आलेल् जोडपं म्हणजे यश आणि गौरी यांच्या दोघात दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. गौरीने परदेशात नोकरी करण्याचा घेतलेला निर्णय यशला अजिबात पटलेला नाही. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होताना दिसत आहे. त्याचमुळे यश डिस्टर्ब झाला आहे. एकंदर यापुढे देखील मालिकेतील रंगत चांगलीच वाढत जाणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/p/CkfrsPWJtyE/?utm_source=ig_web_copy_link
Arundhati Left Marathi TV Serial Aai Kuthe Kay Karte
Entertainment Star Pravah