नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वरील फोटो बघून आपल्यालाही वाटले असेल की कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे हे चित्र आहे किंवा पोट्रेट. पण, प्रत्यक्षात ही आहे चक्क रांगोळी. महालक्ष्मीचे हे अनोखे रुप साकारले आहे नाशिकची रांगोळी कलाकार स्नेहा अभय नेरकर हिने. निमित्त होते पोट्रेट रांगोळीचे प्रदर्शनाचे.
जामनेर येथे दुर्गा इच्छा मित्र मंडळ यांच्या वतीने पोट्रेट रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात नाशिकची रांगोळी कलाकार स्नेहा नेरकर हिने ५ दिवसात ५० तास काम करीत ही रांगोळी साकारली आहे. यात पांढरी रांगोळी आणि लेक कलरचा वापर करण्यात आला आहे. प्रदर्शनात पाचोरा येथील शीतल आर्टच्या सौ. शीतल पाटील, श्री. निशिकांत पाटील, कु. साक्षी पाटील, कु.अनुष्का पाटील, कु. नयना गुजर, कु. मयुरी पवार, कु. प्रांजल पाटील, कु. वैष्णवी पाटील यांनी अनेक देवीची चित्रे रांगोळीतून साकारली.
कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रांगोळीचा बघा हा व्हिडिओ
Artist Sneha Nerkar Mahalaxmi Rangoli