नाशिक – रोटरी क्लब ऑफ नासिक ग्रेपसिटी तर्फे अण्णासाहेब वैशंपायन हायस्कूल, महात्मा नगर येथे कृत्रिम अवयवरोपण शिबीर राबवण्यात आले. एनसीपीचे प्रमुख व वैशंपायन शाळेचे विश्वस्त श्री. रंजन ठाकरे यांनी प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी या उपक्रमाला पाठिंबा दर्शवत रोटरीचे सदस्य इतरांना जणू दुसरे जीवनच देत आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच भविष्यात अशा उपक्रमांकरता सर्वतोपरी मदत आणि शाळेची जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही दिले.
या उपक्रमाचा आर्थिक भार उचलणाऱ्या ब्लू क्रॉस कंपनीचे संचालक श्री.अनुप बर्मन, सीएसआर प्रमुख श्री.संजय माहुली आणि रोटेरीयन श्री. जगदीश गिल्डा यावेळी हजर होते. रोटरी पीन लावुन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
श्री. गिल्डा यावेळी म्हणाले की रोटरीने असे अनेक उपक्रम राबविण्याची गरज आहे. तसेच यावेळी एकूण २०० कृत्रिम अवयवदानाचा कार्यक्रम आयोजित केला असेही त्यांनी सांगितले.
रत्ननिधी संस्थेचे कार्यकर्ते, संबधिताची मोज मापे घेवुन कृत्रिम अवयव तयार करणे आणि ते बसवणे अशी दुहेरी व मोलाची जबाबदारी पार पाडत आहेत. या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेपसिटीच्या वैद्यकीय समिति प्रमुख ज्योतिका पै, तसेच सदस्या रेणू पनीकर, डॉ.आभा पिंप्रीकर यांनी रूग्णांना संपर्क करणे, रत्ननिधी संस्थेच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधणे या व इतर बाबींसाठी विशेष परिश्रम घेतले.
डॉ. पिंप्रीकर स्पोर्ट्स्-मेडचे डॉ. मुस्तफा टोपीवाला यांनी या रूग्णांनी करायच्या विशिष्ट व्यायामांचे पत्रक तयार करून दिले आणि यासंदर्भात रूग्णांना मार्गदर्शनही केले. रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेपसिटीचे अध्यक्ष रोटेरीयन अनिल देशमुख, मानद सचिव जयंत खैरनार, डीजीएन आशा वेणूगोपाळ, कोषाध्यक्ष राजन पिल्लई , उपाध्यक्षा विभा घावरे, पी.पी. दुर्गा साळी, अलका सिंह, संजीव कौशिक, अंजली मेहता, तसेच सभासद पद्मिनी सुजातन , जलप्रभा देशमुख , जलउषा देशमुख, राजेंद्र पाटणकर, प्रज्ञा पाटणकर, दिलपाल राना, अरविंद पांचाळ, शीला पांचाळ, सुनिता वाघ, शेफाली अगरवाल यानी प्रकल्पासाठी आळीपाळीने उपस्थित राहून सहकार्य केले. रोटेरीयन जलप्रभा देशमुख व श्री गणेश पै यांनी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था केली. कोविडसंदर्भातील सगळे नियम पाळून हा उपक्रम राबविण्यात आला. एकूण ५५ रूग्णांना कृत्रिम अवयव बसविण्यात आले. त्यांच्या चेह-यावरील आनंद व समाधान अवर्णनीय होते. गरजू व गरीब व्यक्तींना कृत्रिम अवयवांचा लाभ मिळावा, यासाठी हे शिबिर पुन्हा एकदा २३ ऑगस्ट रोजी आयोजित केले जाणार आहे. ही माहिती आपल्या परिचयातील गरजूंना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.
रो. ज्योतिका पै ९८२०७५५६६८
रो. रेणू पनीकर ९४२२२४३२६३
रो. डॉ. आभा पिंप्रीकर ९९२२८२५९९९