इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) याचा सध्या बोलबाला आहे. मात्र, याच तंत्रज्ञानामुळे आता अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. एकट्या मे महिन्यातच तब्बल ४ हजार लोकांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, कंपन्या AI चा वापर त्यांच्या फायद्यासाठी करत आहेत, त्यामुळे लोक आता नोकऱ्या गमावत आहेत.
एका मीडिया रिपोर्टनुसार, मे २०२३ मध्ये एकूण ८० हजार लोकांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. यापैकी AI मुळे ३९०० जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. इतरांना आर्थिक परिस्थिती, आकार कमी करणे, पुनर्रचना इत्यादींमुळे काढून टाकण्यात आले आहे. अहवालानुसार, २०२३ मध्ये आतापर्यंत म्हणजे अवघ्या ५ महिन्यात एकूण ४ लाख लोकांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. प्रथमच, एआयमुळे टाळेबंदी झाली, तीही इतक्या मोठ्या प्रमाणात.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, OpenAI ने चॅटजीपीटी लाँच केले आहे. जे काही वेळातच चर्चेत आले. यानंतर, फेब्रुवारी २०२३ मध्ये, Google आणि Microsoft ने त्यांचे AI लाँच केले, ज्याचे नाव Bard आणि Bing आहे. आज बहुतेक कंपन्या त्यांचा फायदा घेत आहेत, ज्यामुळे ४ हजार लोकांना नोकरी गमवावी लागली आहे.
Artificial Intelligence AI Lay Off Figure