जागतिक मलेरिया दिन
जागतिक मलेरिया दिन दरवर्षी २५ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. हा विशेष दिवस मलेरिया तापाबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो. मलेरिया हा एक जीवघेणा आणि तीव्र तापजन्य आजार आहे. जो संक्रमित मादी अॅनोफिलीस मच्छर चावल्यामुळे पसरणाऱ्या परजीवीमुळे होतो. जगातील एकूण रुग्णांचा विचार करता त्याचा ३ टक्के वाटा भारतात आहे. त्यातील ३८ टक्के नागरिक हे मलेरियाच्या आजाराचे उपचार न घेतलेले, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले अवावे किंवा त्यांचे प्रकरण गुंतागुंतीचे असू शकते. त्यात रोग उलटण्याचे प्रमाण ३० टक्के आहे.काही वर्षांच्या अंतराने पुन्हा मलेरिया झाल्याचे प्रमाण त्यात आहे. त्यामुळे मलेरियाची लक्षणे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती नाशिक येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉ. राहुल बस्ते (एम.बी.बी.एस. एमडी, सल्लागार : फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट) यांनी दिली.
मलेरियाची लक्षणे ही प्रामुख्याने ताप येऊन (सतत मधूनमधून) थंडी वाजून येणे, डोकेदुखी, मायल्जिया (शरीर दुखणे), आर्थल्जिया (सांधेदुखी), एनोरेक्सिया, मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे (मच्छर चावल्यानंतर— लक्षणे सामान्यत ९ ते १४दिवसांच्या संपर्कानंतर दिसतात)ज्यांच्यामुळे मलेरिया होवू शकतो असे, मुख्यतः ५ प्रकारचे मलेरिया परजीवी अस्तित्वात आहेत.(४०ते ५० % प्रकरणे फाल्सीपेरम मलेरियामुळे होतात)
जोखमीचे घटक –
विशिष्ट रोग प्रचलित असलेल्या भागात प्रवास करणे, उच्च जोखमीचे उपक्रम ज्यात घराबाहेरील क्रियांचा समावेश आहे (विशेषतः रात्री) उदा.
– लष्करी कर्मचारी
– निमलष्करी दलाचे कर्मचारी
– सुरक्षा कर्मचारी
– ट्रेकिंग करणारे
– वन अधिकारी
मच्छीरांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात
वारंवार प्रवासी वरील जोखीम घटक असलेल्या लोकांच्या संपर्कात येणाऱ्यांनी अल्पकालीन (६आठवडे) किंवा दीर्घकालीन ( ६आठवडे) केमोप्रोफिलॅक्सिस घ्यावे.
मलेरिया टाळण्यासाठीबाहेर फिरताना, शरीराच्या पृष्ठभागाचे अवयव जास्तीत जास्त झाकले जातील असे पूर्ण कपडे घालावे.
टॉपिकल रिपेलंट्स लावा (मच्छर चावू नये साठीच्या क्रीम किंवा जेल)लार्विसिडल मासे घरी ठेवा, विशेषतः: जर डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे पूर्णपणे काढून टाकली जाऊ शकत नसतील तरआयटीएनचा वापर (कीटकनाशके उपचारित जाळी)
घरातील अवशिष्ट फवारणीचा वापर.अळीभक्षक मासे (गॅम्बुसिया ऍफिनिस – मच्छरदाणी) पाणवठ्यांमध्ये सोडावेत. मच्छर रॅकेट वापरणे.घरात अस्वच्छ पाणी साठवण स्थळे वारंवार बदलणे.मच्छरांना प्रतिकार करणारेऱ्या झाडांचे संगोपन ( रोझमेरी / लिंबू मलम / झेंडू / तुळस / लेमन ग्रास / लसूण / सिट्रोनेला गवत/ पुदीना/ कटनीप)
डब्ल्यूएचओचे लक्ष्य – मलेरियाच्या घटना आणि मृत्यूचे प्रमाण ९० टक्केने कमी करणे (२०३० पर्यंत) ३५ देशांमध्ये २०३० पर्यंत मलेरिया नष्ट करणे.मलेरिया मुक्त देशांमध्ये मलेरियाचे पुनरुत्थान रोखणे.
कशाद्वारे होते मलेरियाचे निदान – रक्त तपासणी (मायक्रोबायोलॉजिकल स्मीअर्स). रॅपिड डायग्नॉस्टिक किट्स (आरडीके)
मलेरियाबाबत महत्त्वाची माहिती :
1. आनुवंशिक घटक जे मलेरियापासून संरक्षण करतात. जसे की
सिकल सेल वैशिष्ट्य आणि डफी रक्त गट नकारात्मक लोक.
2. अधिग्रहीत प्रतिकारशक्ती (अर्ध – रोगप्रतिकारक लोकसंख्या) – मलेरियाच्या वारंवार हल्ल्यांनंतर लक्षणे नसलेला सौम्य संसर्ग होतो)
3. नवजात मुलांमध्ये उच्च प्रसारित भागात अँटिबॉडी असतात.
4. गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचा उच्च धोका असतो. जर गर्भवती आईला पहिल्या तिमाहीत संसर्ग झाला असेल तर बाळाचा अकाली जन्म होण्याची शक्यता असते. तसेच नवजात मुलाचे वजन कमी असू शकते.