सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी आयपीओचे धडे
भारतातील भांडवली बाजाराचे डिजीटलीकरण झाल्यापासून भारतामध्ये सर्वसाधारण गुंतवणूकदारांच्या सहभागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. एकूण गुंतवणूकदार संख्येपैकी आता जास्तीत-जास्त लोक हे १८-३५ वर्षे वयोगटातील पहिल्यांदा गुंतवणूक करणारे आहेत. हा काळ युवा गुंतवणूकदारांसाठी रोमांचक काळ असताना त्यांनी लक्ष देणे आणि गुंतवणूकीतील काही मुलभूत चुका करणे टाळणे देखील आवश्यक आहे, खासकरून आयपीओंच्या बाबतीत लक्षात घेतले जात असेल. भारतीय शेअर बाजारामध्ये मागील वर्षी आयपीओंमध्ये वाढ झालेली आढळून आली. तोच प्रकार यावर्षी देखील तसाच सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र या ब-याचशा कंपन्या सार्वजनिक होण्याच्या क्रियेमध्ये होत असलेल्या वाढीनुसार गुंतवणूकदारांमध्ये आयपीओंची लोकप्रियता वाढण्यासारखा महत्त्वाचा प्रकार देखील पाहण्यास मिळत आहे. यातील बहुतांशी गुंतवणूकदार तरूण आहेत.
एक सार्वजनिक बाजारातील गुंतवणूकदार म्हणून त्यांच्याकडून होणा-या सर्वसाधारण चुका आणि ज्या करणे टाळायला हवे याबद्दल सांगताहेत एंजेल वनचे एव्हीपी मिडकॅप्स, श्री. अमरजीत मौर्य.
कंपनीचे बिझनेस मॉडेल न समजून घेणे:
आयपीओमधील समजून घेण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचे बिझनेस मॉडेल आणि आयपीओची किंमत किती निर्धारित झाली आहे, किंमत कमी ठरली आहे की अधिक आहे हे कंपनीची मुलभूत माहिती पाहून लक्षात घेतले पाहिजे. जगातील यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफेट हे कोणतेही स्पष्ट बिझनेस मॉडेल नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावधान राहण्याचे सुचवतात. तुम्ही कोणत्याही कंपनीच्या वैयक्तिक शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर कंपनीचे बिझनेस मॉडेल समजून घेणे आणि भविष्यातील तिची वाढ समजून घेणे महत्त्वाचे ठरते. या विश्लेषणाच्या आधारावर तुम्ही एक विस्तृत पोर्टफॉलिओ बनवून अशी काही चूक करणे टाळू शकता.
कंपनीच्या नावाला बळी पडणे:
अलीकडे, पेटीएम आणि झोमॅटोसारख्या नवीन युगातील कंपन्यांचे आयपीओ निघाल्यानंतर गुंतवणूकदारांचे काय झाले ते आपण पाहिलेच आहे. या आयपीओंचा जो बोलबाला झाला तो या कंपन्यांच्या नवीन पिढी आणि तरूणांमधील लोकप्रियतेमुळे नव्हता. गुंतवणूकदारांनी गणित मांडून निर्णय घेण्यापेक्षा भावनिक संबंध जोडून या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे सर्वसाधारण आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना त्यांच्या भावना बाजूला ठेवणे आणि तसा फरक करून व्यवहार करणे गरजेचे आहे.
मार्केटचा काळ ओळखणे:
बाजारपेठेचा काळ ओळखणे अनुभवी गुंतवणूकदारांसाठी देखील व्यर्थ प्रयत्न ठरू शकतो. मानवी स्वभावच असा आहे की, किंमतीमध्ये घट होताच गुंतवणूकदार बाजारपेठेत गुंतवणूक करणे सोडून देतात. ते अशावेळी बाजारपेठेत गुंतवणूक करण्यासाठी सावधगिरी बाळगतात. गुंतवणूकदारांमध्ये बाजारपेठेबाबत विश्वास निर्माण होण्यास दीर्घकाळ लागतो आणि दर पूर्वपदावर आल्यानंतर ते पुन्हा गुंतवणूक करतात. म्हणूनच गुंतवणूकदारांनी लघुकालीन परताव्याकडे न पाहता दीर्घकालीन परताव्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
वैविध्यपूर्ण गुंतवणूक करण्यात अपयशी होणे:
गुंतवणूकदारांनी त्यांचा पैसा कधीच एकाच फंडामध्ये गुंतवू नये. पोर्टफॉलिओचा विस्तार होण्यासोबत पैसा कमोडिटीज, स्थावर मालमत्ता, शेअर्स आणि बाँड्स सारख्या वेगवेगळ्या मालमत्ता वर्गामध्ये गुंतवणे गरजेचे असते. ते त्यांच्या गुंतवणूकीच्या करिअरमध्ये सुरूवातीची पावले टाकत असताना त्यांनी ग्लोबल फंडची निवड करायला हवी. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ करण्याचा एक मार्ग म्हणजे १० टक्क्यांपेक्षा अधिक पैसा एका फंडामध्ये न लावणे. वैविध्यीकरण गाठण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणे. गुंतवणूकदारांना त्यांची जोखीम रक्कम वेगवेगळी गुंतवणूक लक्ष्ये ठेवून एकाधिक म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक करायची आहे.
भावनांचा तुमच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ देऊ नका:
भांडवली बाजाराचे सत्य हे आहे की, भीती आणि हाव हीच बाजारावर राज्य करते. एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही भीती किंवा हाव तुमच्या निर्णयांवर नियंत्रण मिळवू द्यायला नको असते. विस्तृत दृष्टीकोन ठेवा. शेअर बाजारातून मिळणारा परतावा कमी कालावधीमध्ये जबरदस्त प्रमाणात ढळत जाऊ शकेल हे कायम लक्षात ठेवा. दीर्घ कालावधीमध्ये लार्जकॅप स्टॉकचे ऐतिहासिक परताव्यामध्ये सरासरी १०% ची क्षमता आहे. बेहिशेबी निर्णयक्षमतेपासून दूर राहण्यासाठी व्यक्तीने संयमी असणे महत्त्वाचे आहे.
सारांश:
चुका करणे हे गुंतवणूकीच्या प्रवासाचा भाग आहे. मात्र काही चुका टाळता येऊ शकतात आणि या चुका टाळण्याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या गुंतवणूकीसाठी एक अॅक्शन प्लॅन करणे. तुम्हाला सक्रिय होऊन तुमच्या गुंतवणूकींचे चक्र ठरवणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या ध्येयांप्रमाणे आयपीओंमध्ये गुंतवणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या निर्णयक्षमतेवर आत्मविश्वास वाटत नसेल तर अधिक संशोधन करायला मागे-पुढे पाहू नका किंवा आर्थिक सल्लागारांशी संपर्क साधा. विचारपूर्वक, पद्धतशीर दृष्टीकोन हाच आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्याची गुरूकिल्ली आहे.