कोरोना काळातील कोर्सेसचे “शतकवीर प्राचार्य”
नाशिक येथील कर्मवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश दरेकर यांनी गेल्या वर्षभरात ऑनलाईन तथा दुरुस्त शिक्षणप्रणालीचा सकारात्मक उपयोग करून घेतला व आपल्या सहकाऱ्यांना देखील याविषयी मार्गदर्शन केले. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस च्या माध्यमातून “मुकं करोति वाचालम” चा प्रत्यय अनुभवला.
प्रा. अमोल पाटील
“शिक्षण हे एकमेव उन्नतीचे साधन आहे असे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. “पण कोरोना ह्या जागतिक संकटामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आज आपला भारत देश प्रगतीच्या अती उच्च शिखराकडे वाटचाल करत असताना कोरोना विषाणू म्हणजे Covid-19 सारखे संकट जगभर महाथैमान घातले आहे. या विषाणूने सर्वच क्षेत्रात मोठ्या अडचणी निर्माण केलेल्या आहेत. कोरोनाच्या संकटासमोर जागतिक बलशाली महासत्ता असलेले राष्ट्र देखील हतबल झालेली आपल्याला दिसत आहेत. यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्च २०२० पासून काही कालावधी साठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली. दरम्यानच्या काळात कोरोणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय किंवा अडथळा येऊ नये, विद्यार्थी हा शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग निवडण्यात आला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आपल्याला दिसत आहे.
दुरशिक्षण माहिती तंत्रज्ञानाचा वापर, यू-ट्यूब, हँगआउट, मल्टिमीडीया ,मोबाईल फोन ई-लायब्ररी, दुरदर्शन इ. माध्यमातून अनेक देशांनी तातडीने मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून वरील प्रकाराच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. परिस्थितीची अनिश्चितता लक्षात घेतली तर आपल्या देशाने सुद्धा दिर्घ काळासाठी शैक्षणिक धोरण ठरविणे आवश्यक आहे. आपल्या देशात उच्च शिक्षणात व मेडिसिन, इंजिनिअरिंग ,काँमर्स व मँनेजमेंट यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे प्रामुख्याने अभिजन वर्गाच्या छोट्या गटांचा अभ्यास आँनलाईन चालू आहे.
जवळपास सर्वच शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे. त्यासाठी काहींनी स्वतः शिकून घेतलं आहे. कोरोनाकाळानं शिक्षकांना तंत्रज्ञानाचा वापर करायला लवकर शिकवलं. शिक्षकांना ज्या गोष्टीला आणखी काही वर्षं लागली असती त्या ऑनलाईन शिक्षणातल्या गोष्टी चारपाच महिन्यांत अवगत केल्या आहेत. हे गरजेतून झालं आहे. कोरोना काळात टाईमपास करणारे, आराम करणारे असे अनेक झाले मात्र याच कोरोना काळाची सकारात्मक बाजू घेत एका प्राचार्याने एक विक्रमच प्रस्थापित केला आहे. त्या अवलिया प्राचार्यांचं नाव आहे, डॉ. अविनाश दरेकर. या लेखात आपण प्राचार्य डॉ. अविनाश दरेकर यांनी साधलेल्या किमये बद्दल जाणून घेणार आहोत.
नाशिक येथील कर्मवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश दरेकर यांनी गेल्या वर्षभरात ऑनलाईन तथा दुरुस्त शिक्षणप्रणालीचा सकारात्मक उपयोग करून घेतला व आपल्या सहकाऱ्यांना देखील याविषयी मार्गदर्शन केले. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस च्या माध्यमातून “मुकं करोति वाचालम” चा प्रत्यय अनुभवला. औषधनिर्माणशास्त्रात पारंगत असलेले प्राचार्य डॉ. दरेकर, व्यवस्थापनात सुद्धा तज्ञ् आहे. दरम्यानच्या काळात, विविध राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांबरोबर विविध ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म देणाऱ्या संस्था जसे स्वयम, कोर्स ईरा, अपग्रॅड, युडॅसिटी, फ्युचर लर्न, अलीसन यांचे मार्फत विद्यार्थी, शिक्षक व ज्ञानार्जन करणाऱ्या प्रत्येकासाठी जागतिक दर्जाचे दालन खुले करण्यात आले.
प्राचार्य अविनाश दरेकर यांनी विविध प्रकारच्या ०७ पदविका कोर्सेस पूर्ण केले.
अमेरिकेतील ग्लोबल टेक्स्ट प्रोजेक्ट, त्याचप्रमाणे AMEDD सेंटर अँड स्कुल- टेक्सास , स्किल कॉमन्स-कॅलिफोर्निया, इंग्लंड येथील कोर्स फ्लिक्स, ऑस्ट्रेलियातील XSIQ, भारतातील NPTEL येथून कोर्सेस पूर्ण केले. विविध सर्टिफिकेट कोर्सेस व आंतरराष्ट्रीय क्रेडिट प्रदान करणारे कोर्सेस ज्यामध्ये सुमारे ०२ ते ०६ आठवडा कालावधी असणारे तर काही स्वयंप्रगती आधारित प्रणालीद्वारे संवाद कौशल्य, हेल्थ केअर, लेखन कौशल्य, बायोइन्फॉर्मेटिक्स , जिनोमिक्स, कोव्हीड-१९, प्लेग, व्हायरॉलॉजी, सारी, एच.आय.व्ही. एड्स, करिअर डेव्हलपमेंट, कृत्रिम बुद्धिमत्ता, मोबाईल ऍप्लिकेशन, वेब ऍनालिसिस, डिजिटल मार्केटिंग, लीडरशिप, सॉफ्टवेअर सोल्युशन्स, बायोसिक्युरिटी, स्लिप डेप्रिव्हेशन, फार्माकोथेरपी, उद्योजकता विकास, आय टी एथिक्स, प्लेगारीझम, क्लिनिकल रिसर्च, सिक्स सिग्मा, ड्रग रेग्युलेटरी अफ़ेअर्स, फार्मा मार्केटिंग अँड मॅनॅजमेन्ट, या आणि अशा अनेक जागतिक दर्जाच्या विद्यापीठांनी तैयार केलेली, १०० ऑनलाईन कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण केली.
जागतिक विद्यापीठांपैकी सरांनी हार्वर्ड मेडिकल स्कुल-अमेरिका, मिशिगन विद्यापीठ-अमेरिका, लीड्स विद्यापीठ-इंग्लंड, डब्लू एच ओ -जिनेव्हा , क्विन्सलँड विद्यापीठ-इंग्लंड, डोकीं विद्यापीठ ऑस्ट्रेलिया , पेनसिल्व्हानिया विद्यापीठ -अमेरिका, अलीसन- आयर्लंड, एनपीटीईएल -भारत, स्किल्सकॉमन्स – कॅलिफोर्निया, मोनॅश विद्यापीठ -ऑस्ट्रेलिया, कॉव्हेंट्री विद्यापीठ- इंग्लंड, ग्रिफिथ विद्यापीठ-ऑस्ट्रेलिया, अकेन्च्युर विद्यापीठ इंग्लंड, मोहम्मद बिन रसीद युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्सेस- संयुक्त अरब अमिरात, एपीटीआय- भारत, डि . बाटु- लोणेरे, टेलर-फ्रान्सिस अँड फार्मा स्टेट अकॅडमी अशा राष्ट्रीय आणि जागतिक विद्यापीठे तथा संस्थांचा यात समावेश आहे. काही दिवसांपासून, काही आठवड्यांपर्यंत, महिन्यांपर्यंत हे कोर्सेस शिकून त्यांची परीक्षा देऊन यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन एक नवा विक्रम डॉ. दरेकरांनी समस्त शैक्षणिक विश्वात प्रस्थापित केला आहे जो नक्कीच कौतुकास्पद आहे. गंभीर काळात परिस्थितीला सामोरे जाताना, हताश न होता, निराश न होता, हतबल न होता प्रगतीचा मार्ग परिस्थितीनुसार बदलून स्वतःला प्रगतीपथावर नेण्यासाठी सुकर करून घेणारेच या स्पर्धात्मक युगात टिकत असतात. प्राचार्य डॉ. अविनाश दरेकरांनी शिक्षणाप्रती दाखविलेली तत्परता, जिज्ञासा आणि संशोधक वृत्ती नक्कीच आजच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकवृंदाला दिशादर्शक ठरेल यात दुमत नाही.