ऑनलाईन रोलेट, बिंगो, जुगार बंद झालाच पाहिजे
– नंदन भास्करे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, नाशिक)
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात गेम किंग कंपनी चे रोलेट नावाने ऑनलाईन जुगाराची लिंक च्या माध्यमातून हजारो युवकांचे आर्थिक मानसिक व तसेच गुंडांच्या माध्यमातून शारीरिक छळाला सामोरे जावे लागले आहे राज्यातील काही भागांमध्ये तर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे त्यामध्ये महाराष्ट्रत बिंगो चे मोठे नेटवर्क उभे राहिलेल्या असून गेल्या दोन वर्षात अनेक गुन्हे गेम किंग कंपनी चे सर्वेसर्वा महेश चौरसिया व आचल चौरसिया आणि तसेच नाशिक जिल्ह्याचे डिस्ट्रीब्यूटर कैलास शहा यांच्यावर अनेक पोलिसात तक्रारी दाखल सातत्याने यांच्यावर ओक यांची कारवाई का झाली नाही? सर्वसाधारण माणसाने थोडातरी काही गुन्हा केला तर त्याच्यावर नको त्या कारवाई होते सदर रोलेट किंग चौरशिया व शहा हे प्रशासनाचे जावई आहे का? रोलेट चालवणाऱ्यांना व आयडी देणाऱ्या सर्व एजंटची जर व्यवस्थित चौकशी केली तर सर्वात मोठे गुन्हेगार याची साखळी यामधून बाहेर येईल जर गुन्हेगारी समूळ नष्ट करायची असेल तर खरच संबंधित गुन्हेगारांना मोक्याची कारवाई चालू हिवाळी अधिवेशनात करण्यात यावी.
1. funrep वैद्य ऑनलाईन जुगाराचे संकेतस्थळाचे नाव funrep. Vip. Plavrep आणि mydgp. Online/download या वेबसाईट मार्फत मोबाईल ॲप द्वारे महाराष्ट्राच्या शाळेतील व महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःचा फायदा करीत आचल चौरशिया रमेश चौरशिया आणि कैलाशा जुगार अमली करीत आहेत.
2. आज पर्यंत वर नमूद वेबसाईट मार्फत कमीत कमी 15000 कोटी रुपये शासनाचा महसूल बुडवण्यात आलेला आहे.
3. वर नमूद चौरसिया बाप बेटे ने आज पर्यंत महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेकडून लाखो करोडो रुपये लुटून संपूर्ण देशा आणि परदेशात अनेक बेनामी संपत्तीचे जाळे पसरवले आहे आणि 35 ते 40 फेक कंपनी बनवून जुगार व्यवसायातून लुटलेले पैसे फिरवून शासनाच्या डोळ्यात धूळ टाकण्याच काम करीत आहेत.
4. 2013 ते आज पर्यंत शेकडो गुन्हे महाराष्ट्र आणि मुंबईत दाखल आहेत परंतु आजपर्यंत कुठलाही कडक कारवाई झालेली नाही.
5. 19 मार्च 2018 रोजी यांचे गैर कायदेशीर जुगारबद्दल तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब आणि परब साहेब आणि इतर आमदारांनी विधानपरिषद चर्चा केली. तसेच दिनांक 12 ऑगस्ट तर 2021 महाराष्ट्र विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष श्री नरहरी सिताराम झिरवाळ साहेब यांच्या दालनात अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कारवाई करण्यासाठी चर्चा करण्यात आली होती
6. महाराष्ट्राचे ग्रामीण किंवा शहरी भागाचे मोठे प्रमाणात पैसे हरून लोकांनी आत्महत्या केल्याने आज पर्यंत पोलिसात सुद्धा नोंद आहे तसेच अनेक लोक सदम्यात जाऊन सुद्धा मरून गेले आहेत.
7.(a) तसेच माझी विनंती आहे की वर नमूद चौरस याची पूर्ण कंपनी ऑडिट करून शासनाचा बुडवलेला महसूल वसूल करावा
(b) वर नमूद वेबसाईट कायमस्वरूपी बंद करण्यात यावी
(C) चौरसिया बंधू आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर मोका, फेमा,पीएमएलए आयटी कायदा 2000,420 व इतर कडक कायद्याअंतर्गत माध्यमातून कोथडी करण्यात यावी
8. सदर चौरसिया कैलास शहा यांचे गुंडाचे जाळे असून आजपर्यंत खूप दबाव धमक्यांचे सामोरे जातो आहे तरी मला पोलीस संरक्षण मिळावे