“झाडे लावा – झाडे जगवा” ही संकल्पना आपण नेहमीच एेकतो परंतु ती प्रत्यक्षात फार कमी ठिकाणी अंमलात आणली जाते. फक्त फोटो सेशनपुरतीच मर्यादित रहाणारी झाडे लावण्याची संकल्पना पर्यावरणासाठी काहीही उपयोगाची नाही कारण झाडांची छोटी छोटी रोपे स्वंयपुर्ण होईपावेतो त्यांची एखादया लहान बाळाप्रमाणे निगा राखावीच लागते.
नाशिकच्या जुने सिडको विभागात शॉपींग सेटंर (भाजी मार्केट) च्या मागे एक मोठे मैदान गेल्या अनेक वर्षांपासून अस्तीत्वात आहे. नाशिक महानगरपालिकेने चारही बाजुला भिंत बांधून हे मैदान संरक्षित केले आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जुन २०१५ रोजी या मैदानाच्या चारही भिंतीलगत येथील गायत्री आयुर्वेद योगसेवा संशोधन व विकास संस्थेतर्फे झाडांची लागवड करण्यात आली होती. यावेळी भारतीय हवामानास पुरक असलेली व जास्त ऑक्सिजन देणारी झाडे जसे की, बेल, वड, पिंपळ, कडुनिंब, हिरडा, बेहडा, पेरु, बकुळ व शिसव ही झाडे लावण्यात आली होती. ही झाडे लावतांना नाशिकच्या वैदयकीय क्षेत्रातील नामंवत अशा डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी, पॅथॉलॉजिस्ट डॉ.विजय गवळी, नेञरोगतज्ञ डॉ.विश्वास भामरे, डॉ.अजय गुजर, डॉ. कासार यांना झाडे लावण्यासाठी निमंत्रीत करण्यात आले होते.
झाडे लावण्यामागची ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाडे लावतांना प्रत्येक फोटो काढण्यापूर्वी मागच्या बाजुला एक बोर्ड लावण्यात आला होता. या बोर्डवरचा मजकुर काहीसा असा होता. “एका दिवसात सामान्यत: माणुस ३ सिलेंडर भरतील इतक्या प्राणवायुचे श्वसन करतो. एका ऑक्सीजन सिलेंडरची सरासरी किंमत रू. ७०० आहे. म्हणजेच एका दिवसाला एक माणूस रू.२१०० या प्रमाणे वर्षाला रू.७६६५०० रूपयांचा प्राणवायु घेतो. माणसाचे सरासरी आयुर्मान ६५ वर्ष धरले तर हीच किंमत साधारणपणे ५ कोटी रूपये इतकी येते. माञ हाच प्राणवायु आपल्या परिसरात आजुबाजूला लावलेल्या झाडांपासून आपल्याला फुकट मिळत असतो” २०१५ साली ही झाडे लावतांना लोकांसमोर ठेवलेले हे प्राणवायुचे गणित सुमारे सहा वर्षानंतर म्हणजे २०२१ येईपर्यन्त तंतोतंत खरे ठरले. या संस्थेने लावलेली हीच रोपे देखील आता मोठया झाडात रुपांतरीत झाली आहेत. या लेखासोबतचा व्हिडीओ जर आपण बघितला तर आपणास याचा प्रत्यय येईल. अर्थात, ही झाडे जगविण्यामागे एक तळमळ आणि परिश्रम देखील आहेत. संस्थेचे सचिव डॉ. संदीप सुतार यांनी झाडे लावून झाल्यानंतर परिसरातील काही लोकांच्या मदतीने त्यांची व्यवस्थित निगा राखली. त्यांची दवाखान्यातली ओपीडी संपल्यांनंतर ते कित्येक दिवस त्यांच्या गाडीमध्ये भरुन ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या मैदानावर घेवून जायचे आणि प्रत्येक झाडाला पाणी टाकायचे. त्याचा परिणाम असा झाला की निसर्गत: जमिनीतील पाणी शोषण्याइतपत या झाडांची मुळे मोठी होर्इपावेतो, ती झाडे जगविण्याची किमया साधली गेली आणि आज वड, पिंपळ, कडुनिंब यासारखी मोठी झाडेच नव्हेत तर बेल, हिरडा, बेहडा, बकुळ, शिसव यांच्यासह इतर अनेक झाडे मैदानाच्या आजुबाजूला स्वयंपुर्ण होवून दिमाखात उभी आहेत, हिरवीगार झाली आहेत आणि थंड सावली देण्याइतपत डेरेदार देखील होवू लागली आहेत. गायञी आयुर्वेद या संस्थेने राबविलेल्या या मोठया कामात डॉ. सुतार यांना त्यांची पत्नी सौ. सुनिता सुतार, सर्वश्री मंगेश राउत, प्रकाश काळे, आकांक्षा देशपांडे, छगन कांबळे, राजेंद्र भालेराव, दिपक लांडगे, अभय गवळी, अनिल झा, परिक्षीत पटवर्धन, किशोर रुळे, नितीन फाल्गुने, विजय जोशी यांची मदत लाभली होती.
या कोरोना काळात ऑक्सीजनचे महत्व सर्वांनाच समजले आहे. शरीराला आवश्यक असलेला ऑक्सीजन मोजण्याइतकी साक्षरता या काळात वाढली. झाडे लावा या विषयावर आपण गेल्या अनेक वर्षांपासून साक्ष्ार होण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु झाडे लावून त्याकडे पाठ फिरवली तर उपयोग होत नाही, याउलट अशा झाडांची निगा राखली गेली तर त्यांचे झालेले संवर्धन सुखद गारवा देण्यासाठी उपयुक्त ठरते हाच संदेश आजच्या या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या उदाहरणातून देता येईल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!