शनिवार, ऑक्टोबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्राच्या चित्ररथांचा असा आहे इतिहास; १२ वेळा पुरस्कार

फेब्रुवारी 10, 2022 | 5:03 am
in इतर
0
chitrarath

 

चित्ररथातून झळकते महाराष्ट्राची अस्मिता

– अंजु निमसरकर, (माहिती अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली)
[email protected] मो.9899114130
यावर्षी प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील पथसंचलनात ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राचा चित्ररथ होता. राज्याच्यावतीने दरवर्षी असे चित्ररथ उभारले जातात ज्यामधून महाराष्ट्राची अस्मिता ठळकपणे दिसावी. सन 1971 ते 2022 या 51 वर्षाच्या काळात महाराष्ट्राने 38 वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचे दर्शन घडविले आहे आणि 12 वेळा ऊत्कृष्ट चित्ररथासाठीचा पुरस्कारही पटकाविला आहे.
यावर्षीपासून राजपथावरील पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिंग तुकडीला ऑनलाईन नोंदणीद्वारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पंथसंचलन संपल्यानंतर MyGov या पोर्टलवर ऑनलाईन मत नोंदणी सुरू झाली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला असून महाराष्ट्राने चित्ररथाच्या सादरीकरणाच्या इतिहासातही सुवर्ण अक्षराने आपली अमिट छाप सोडली आहे.

असा होता महाराष्ट्राचा ‘जैव विविधता व राज्य मानके’ चित्ररथ
चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंच आणि 6 फूट रूंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्ररथावर राज्यफुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोट्या आकर्षक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या. चित्ररथावर मोठ्या आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसेच, युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ दर्शविण्यात आले. या पठारावर आढळणारी विविध जैव विविधता दर्शविण्यात आली. ‘हरियाल’ पक्षाची प्रतिकृती, चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि राज्यवृक्ष ‘आंबा’ ची प्रतिकृतीही उपस्थितांचे आकर्षण ठरले. माळढोक पक्षी, खेकडा तसेच मासा, वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या प्रतिकृतींनीही उपस्थितांचे मन जिंकली होती. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखील या चित्ररथाला ऑनलाईन मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी सर्व समाजमाध्यमांद्वारे विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक 23 टक्के मते मिळाली होती.

आतार्पंयत महाराष्ट्राच्या 12 चित्ररथांना पुरस्कार
महाराष्ट्राला लाभलेल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक-सामाजिक, पर्यटन, संत-वारी परंपरा आदि विषयांवर चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली आहे. यात राज्याने 12 वेळा पुरस्कार पटकावले. वर्ष 1993 ते 1995 पर्यंत सलग तीन वेळा प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम निर्माण केला. आतापर्यंत महाराष्ट्राला 7 वेळा प्रथम पुरस्कार, तीन वेळा द्वितीय पुरस्कार तर दोन वेळा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

वर्ष 1981 आणि 2018 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका’वर आधारित चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. याआधी महाराष्ट्रात ‘पोळा’ या सणाला विशेष महत्त्व आहे. ‘बैलपोळा’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच विषयावर आधारित वर्ष 1983 च्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार देण्यात आला. वर्ष 1993 मध्ये ‘लोकमान्य टिळाकांनी सुरू केलेल्या ‘गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ या चित्ररथाला तर वर्ष 1974 ला फळांचा राजा ‘हापूस आंबा’ या चित्ररथाला आणि वर्ष 1995 मध्ये ‘बापू स्मृती’ या चित्ररथाला असे सलग तीनदा प्रथम पुरस्कार मिळाला. ‘पंढरीची वारी’ या चित्ररथाला वर्ष 2015 मध्ये प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाराष्ट्राचा स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग यावर आधारित वर्ष 1986 च्या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले होते. वर्ष 1988 मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले वर्ष 2009 मध्ये राज्यातील ‘धनगर’ समाजाची संस्कृती दर्शविणाऱ्‍या चित्ररथाने दुसरे पारितोषिक मिळाविले. तर वर्ष 2007 मध्ये ‘जेजुरीचा खंडेराया’ या चित्ररथास तिसरे पारितोषिक मिळाले. वर्ष 2017 मध्ये लोकमान्य टिळाकांच्या योगदानावर आधारित ‘बाळगंगाधर टिळक’ या चित्ररथाला तीसरा क्रमांक मिळाला होता.

समृद्ध संस्कृतीचे दर्शन
महाराष्ट्राने सर्वात प्रथम सन 1971 मध्ये ‘वारली दिंडी’ या विषयावर चित्ररथ सादर केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी 1973 साली ‘ भारत छोडो आंदोलन ’ ही संकल्पना घेऊन या आंदोलनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्ररूप राजपथावर सादर केले होते. राज्य निर्मितीपासून अवघ्या 14 वर्षात राज्यांमध्ये विविध मोठे उद्योगधंदे स्थापित झाले 1974 च्या चित्ररथामध्ये याच उद्योगधंद्यांचे प्रतिबिंब राजपथावर दिसले. पुढे 1978 मध्ये ‘विविधतेत समानता’ असा चित्ररथ राजपथावर झळकला. तर वर्ष 1979 मध्ये ‘बाल विकास ’ या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून बालविकासाचे धोरण दर्शविले. महाराष्ट्रामधील भौगोलिक भागानुरूप विविध सण साजरे केले जातात, असाच विषय धरून 1980 मध्ये ‘ महाराष्ट्रातील सण’ या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला. सन 1982 मध्ये राज्यातील समृद्ध ‘लोककला’ विषयावरील चित्ररथाने राजपथावरील प्रेक्षकांची मने जिंकली.

लोकमान्य टिळकांवर आधारित विविध विषयांवर 4 वेळा चित्ररथ
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांवर आधारित चित्ररथ राजपथावर वेगवेगळ्या विषयाला धरून उभारण्यात आले. प्रथम सन 1984 आणि नंतर सन 2017 मध्ये लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना ‘स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ’ या घोषणेवर आधारित चित्ररथ उभारण्यात आला. या चित्ररथाला दोन्ही वेळा द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष 1988 मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ तर वर्ष 1993 मध्ये ‘लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ विषयावर चित्ररथ होता.

वर्ष 1986 मध्ये स्वातंत्र्याची चाळीशी निमित्ताने ‘स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ असा चित्ररथ राजपथावर सादर करण्यात आला. सन 1990 मध्ये पुन्हा एकदा ‘लोककला’ या विषयावर चित्ररथ राजपथावर दर्शविण्यात आला. वर्ष 1991 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शताब्दी वर्ष निमित्ताने चित्ररथ उभारण्यात आला. ‘वारली तारपा नृत्य’ असा चित्ररथ सण 1992 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात दिसला.

‘हापूस’ आंबा
आंब्यांचा राजा ‘हापूस आंबा’ या संकल्पनेवर सण 1994 मध्ये चित्ररथ साकारण्यात आला. महात्मा गांधीजीच्या 125 व्या जयंती वर्षामध्ये राज्याने वर्ष 1996 ला ‘बापू स्मृती’ असा चित्ररथ दर्शविण्यात आला. वर्ष 1997 ला चित्रपट सृष्टीने शंभरी पूर्ण केली होती. याची आठवण म्हणून ‘चित्रपट सृष्टीचे शंभर वर्ष’ या संकल्पनेवर चित्ररथ साकारण्यात आला. वर्ष 1996 मध्ये ‘महिला बालविकास ’ अशा महत्त्वपूर्ण विषयावर चित्ररथ तयार करण्यात आला. वर्ष 1999 ‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी ’ दर्शविणारा चित्ररथ राजपथावर झळकला. राज्याची ओळख ठळकपणे दर्शविणारे ‘साखर कारखाने’ यावर आधारित 2001 मध्ये चित्ररथ साकारण्यात आला. गोकुळ अष्टमीला दही हंडी फोडणारे गोविंदा यांच्यावर ‘गोविंदा आला’ अशी संकल्पना घेऊन 2002 ला चित्ररथ तर 2003 मध्ये ‘आदिवासी वारली चित्रकला’ असा आदिवासी जीवनावर आधारित चित्ररथ साकारण्यात आला.

‘मुंबईचा डबेवाला’
महाराष्ट्राचा स्थापत्य ठेवा असलेल्या अंजता लेणी यावर आधारित 2004 मध्ये ‘अजिंठा लेणीं’मधील काही भीत्तीचित्रे चित्ररथात दर्शविण्यात आली. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘ग्रामस्वच्छता अभियान’ योजनेवर आधारित चित्ररथ 2006 मध्ये साकारण्यात आला. राज्यामध्ये भरणारी महत्त्वाची धार्मिक जत्रा ‘जेजुरीचा खंडेराया ’ या संकल्पनेचा चित्ररथ वर्ष 2007 मध्ये चित्ररथ दर्शविण्यात आला. पुढे 2009 ला ‘धनगर’ असा विषय घेऊन चित्ररथ उभारण्यात आला. वर्ष 2010 ला जगाचे लक्ष वेधणारा ‘मुंबईचा डबेवाला’ या संकल्पनेवरील चित्ररथ साकारण्यात आला.

‘पंढरीची वारी’
महाराष्ट्राचे नृत्य ‘लावणी ’ यावर आधारित चित्ररथ 2011 मध्ये दर्शविण्यात आला, या चित्ररथाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. वर्ष 2012 मध्ये वेरूळ लेणीमधील ‘कैलास मंदिर’ या विषयावरील चित्ररथ उभारण्यात आला होता. सण 2014 मध्ये कोकणातील मच्छिमारी समुहाचा सण ‘ नारळी पौर्णिमा’ या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला. वर्ष 2015 मध्ये राज्याची शतकांची परंपरा ‘पंढरीची वारी’ या विषयावर आधारित चित्ररथाने राजपथावर भक्तीमय वातावरण निर्माण केले. सण 2019 महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त ‘भारत छोडो ’ आंदोलनवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला. वर्ष 2021 मध्ये ‘वारकरी संत परंपरेवर’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ होता.

महाराष्ट्राचा भूभाग प्राचिन तसेच आधुनिक इतिहासाचा महत्त्वाचा प्रदेश आहे. राज्याच्या निर्मितीपूर्वीही भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या भूभागातून येणाऱ्‍या विचारवंत नेतृत्वाने देशाला दिशा दिलेली होती. राज्य निर्मितीनंतरही आ‍धुनिक महाराष्ट्र, शिक्ष‍ित महाराष्ट्र, स्त्री-पुरूष समानता पाळणारा महाराष्ट्र, राज्यातील लोकांचे जीवनमान उंचावेल अशी धोरणे राबविणे असा राज्याचा मानस सदैव असतो आणि त्याचे प्रतिबिंब चित्ररथात दिसून येते.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या गुरुवारचे राशिभविष्य

Next Post

यशोगाथाः जेवणाची भ्रांत, भेळभत्त्याच्या गाडीवर काम आणि आता पहिल्याच प्रयत्नात सेट उत्तीर्ण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
IMG 20220129 WA0068

यशोगाथाः जेवणाची भ्रांत, भेळभत्त्याच्या गाडीवर काम आणि आता पहिल्याच प्रयत्नात सेट उत्तीर्ण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011