गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लम्पी चर्मरोग: खबरदारी, लसीकरण, वेळीच औषधोपचार हाच उपाय

by India Darpan
सप्टेंबर 20, 2022 | 4:36 pm
in इतर
0
lampi skin

लम्पी चर्मरोग: खबरदारी, लसीकरण, वेळीच औषधोपचार हाच उपाय

सद्या देशात मोठ्या प्रमाणात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाची साथ आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात या रोगाचा प्रसार होत आहे.  वेळीच निदान व योग्य उपचार यामुळे लम्पी चर्मरोगापासून जनावरांचा बचाव करता येतो. यासाठी पशुपालकांनी सजग राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. या रोगाचे संक्रमण माणसांमध्ये होत नसल्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.

लम्पी चर्मरोग हा कॅप्री पॉक्स विषाणूमुळे होतो. गोट पॉक्स (शेळ्यातील देवी ) आणि शिप पॉक्स (मेंढ्या तील देवी ) या विषाणूच्या समुहातील हा विषाणू आहे. प्रामुख्याने गायी, कमी प्रमाणात म्हैशी यांना बाधीत करतो, शेळ्या व मेंढ्यांना अजिबात होत नाही.
रोगाचा प्रसार – परजीवी कीटक (डास, माशा, गोचीड), बाधित जनावराच्या नाकातील/डोळ्यातील श्रावाने दूषित चारा/ पाणी, जनावरांची वाहतूक, बाधित पशुचे वीर्य यापासून होतो.

चर्मरोगाची लक्षणे
बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे 2 ते 14 दिवस एवढा असतो. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते. लसिकाग्रंथीना सुज येते. ताप येतो, दुग्ध उत्पादन कमी होते. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू 10-50 मि. मी. व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर येतात. काही वेळा तोंड, नाक व डोळयात व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, दृष्टी बाधित होते. या आजाराच्या प्रादुर्भावामध्ये फुफ्फूसदाह किंवा स्तनदाह आजाराची बाधा होवू शकते. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते. पायावर सुज येवून काही जनावरे लंगडतात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवू नये. हा आजार संसर्गजन्य असल्याने लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तसेच टोल फ्री क्रमांक 1962 वर संपर्क साधावा. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी. त्याकरिता एक टक्के फॉर्मलीन किंवा 2-3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करता येईल. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी 8 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी व त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. निरोगी जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची फवारणी करावी. रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधीत गावांपासून 5 किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील 4 महिने वयावरील गाय वर्गातील जनावरांना लसीकरण तसेच बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे. योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांचे तात्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात 100 टक्के लसीकरण केले तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते.

लम्पी स्किन रोग नियंत्रणासाठी प्रशासनामार्फत बाधित पशुधनांचे अलगीकरण करण्यात आलेले आहे. त्यांच्यावर शासकीय/निमशासकीय पशुवैद्यकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून औषधोपचार सुरू आहेत. बाधित गावातील सर्व पशुपालकांमध्ये रोगाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. बाधित पशुधनाच्या संपर्कात गावकरी व इतर पशुधन येणार नाही याची दक्षता घेण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. बाधित गावांमध्ये किटक नाशक फवारणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने झालेली आहे. बाधित गावांपासून 5 किमी अंतरावरील त्रिज्येच्या गावांमधील पशुधनास व बाधित गावांमधील निरोगी पशुधनास रिंग पद्धतीने (बाहेरून आत या पद्धतीने) Goat Pox vaccine चे लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे.

सांगली जिल्ह्यासाठी आत्तापर्यंत 1 लाख 63 हजार 100 लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. आत्तापर्यंत 88 हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून पशुधन खरेदी करणे व पशुधनाची वाहतूक करणे, जनावरांचे सर्व आठवडी बाजार बंद करणे, बैलगाडी शर्यतीचे तथा पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करणे इ. बाबींना सक्त मनाई केली आहे. तसेच संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या आजाराचा प्रतिबंध व परिणामकारक नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.

– हेमंत चव्हाण (माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, सांगली)
Article on Lumpi Skin Disease of Animals

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूकः राहुल गांधींच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध

Next Post

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची अवहेलना… राज्य सरकारकडून ना सत्कार… ना बक्षिस… ना दखल…

India Darpan

Next Post
IMG 20220920 WA0018

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची अवहेलना... राज्य सरकारकडून ना सत्कार... ना बक्षिस... ना दखल...

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011