रविवार, नोव्हेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असे असेल ग्रामसमृद्धी अभियान; असे आहेत त्याचे फायदे

फेब्रुवारी 17, 2022 | 5:18 am
in इतर
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

सर्वांच्या आरोग्य, सुख, आनंद, ऐश्वर्यासाठी ग्रामसमृद्धी

समाज प्रबोधक श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचे कार्य सर्वदूर आहे. जीवनविद्या मिशन ही सामाजिक व शैक्षणिक संस्था मागील 65 वर्षापासून समाजातील सर्व स्तरातील कार्यघटकांवर काम करते. अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, भेदभाव नष्ट करणे, स्त्री-सन्मान, शालेय विद्यार्थी व तरुण युवा यांच्याकरिता बाल व युवा संस्कार अभियाने, कार्यशाळा असे विविध प्रकारचे कार्य करून हे जग सुखी व्हावे व राष्ट्र पुढे जावे यासाठी कार्यरत आहे. याच कार्याबरोबर जीवनविद्या मिशन ही शासनासोबत ग्राहक संरक्षण, अवयव दान, विविध व्यसनांच्या दुष्परिणाबाबत जागृतीसह गावांचा सर्वांगीण विकास करणे व सर्वच बाबतीत दत्तक घेतलेली गावे आदर्श गाव बनविणे या उद्देशाने ग्रामसमृद्धी अभियान तसेच शेतकरी आत्महत्या थांबविणे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून मानसिक सबलीकरण असे अनेकविध अभियाने संयुक्त विद्यमाने राबवित आहे. त्याचबरोबर विविध कार्पोरेट व सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्येही अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी Enjoy Your Work, Stress Management या विषयाबाबतच्या कार्यशाळा आयोजित करून जीवनविद्या मिशन कार्य करीत आहे.

भारत देशाचा केंद्रबिंदू असलेल्या खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी जीवनविद्या मिशनने 60 गावे दत्तक घेतली असून त्यापैकी 20 गावांमध्ये जीवनविद्या मिशनने कार्य सुरु केले आहे. त्यातील 4-5 गावांमध्ये अतिशय परिणामकारक बदल दिसून आले. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वांगीण विकास करणे व ते गाव सर्वच बाबतीत आदर्श गाव बनविणे याकरिता ग्रामसमृद्धी अभियान राबविणेबाबतचा प्रस्ताव जीवनविद्या मिशनने शासनास सादर केला आणि जीवनविद्या मिशनने केलेल्या कामांची दखल घेत त्यास मान्यता दिली. याअन्वये आता प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी व समृद्ध करून प्रत्येक गाव सक्षम करत गावातील भौतिक विकासासाठी सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी संस्था, उद्योग समूहाचे आर्थिक सहकार्य मिळवून, गावातील भौतिक विकास कामे करण्याकरिता जीवनविद्या मिशन या संस्थेचे प्रशिक्षित कार्यकर्ते हे कार्य करणार आहेत. यासाठी हे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आणि त्याचा अभ्यास करून त्याचा अहवाल तयार करतील. या अहवालाचे नियोजन ग्रामपंचायतीसोबत सभा करून पुढील उद्दिष्टांवर भर देऊन कार्य करणार आहे.

यात स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, हागणदारी मुक्त गाव, प्लास्टिक बंदी, शून्य कचरा मोहीम, घनकचरा व्यवस्थापन, गाव व आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्त्री सन्मान, बेटी बचाव व बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण, महिला बचत गट यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण व सरकारी योजनांचे मार्गदर्शन, गावागावांत रोजगार वाढीस लागावा व गावाकडून शहराकडे नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी येणारा लोंढा स्थानिक पातळीवरच आपले अर्थार्जन करू शकेल, या उद्देशाने स्थानिक पातळीवर स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे. आवश्यक असल्यास त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे ही महत्त्वाची उद्दिष्ट्ये असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी वर्गाला संघटित करून सेंद्रीय शेती करण्याचे प्रशिक्षण देणे व सेंद्रीय शेती, जोड धंदा, कुटीर उद्योग करण्यास प्रवृत्त करणे, सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे व राबविणे, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करणे, ग्रामसमृद्धी अभियान अंतर्गत गावागावांमध्ये भौतिक विकास साधण्यासाठी सामाजिक दायित्व निधी (CSR) उपलब्ध करून देणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर परंतु मोजका वापर करण्यास शिकवणे, त्याचबरोबर संपूर्ण व्यसनमुक्त गाव, संपूर्ण अंधश्रध्दामुक्त गाव, प्रत्येक घर सुखी करणे, संस्कार युक्त गाव, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रहीत भावना वृद्धींगत करुन उत्कृष्ट नागरीक घडवणे, गावांतील भौतिक विकास कामांना सरकारी योजना व उद्योग समुहांच्या सहकार्याने गती देणे यावरही भर देण्यात येणार आहे.

शासनाशी समन्वय ठेवण्याचे कामही जीवनविद्या मिशन करणार असून प्रत्येक गावामध्ये चालत असलेल्या सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी, शैक्षणिक संस्थामध्ये आठवडयातून एक तास प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने एक तास मानवी जीवनमूल्यांचे संस्कारयुक्त प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहेत. तसेच ग्रामस्थ, व्यावसायिक, विद्यार्थी, पालक यांची मानसिकता बदलण्यासाठी जीवनविद्या तत्वज्ञानाचे मूल्यात्मक संस्कार, शिक्षण ज्ञान, विविध विषयांवरील कार्यशाळा सर्व स्तरांपर्यत पोहचविण्यासाठी मदत करणार आहे. जीवनविद्या मिशनला ही कामे सहजरित्या करता यावीत म्हणून या संस्थेची “सहयोगी मार्गदर्शक संस्था” म्हणून नियुक्ती करण्यात आली असून यापुढे ग्रामसमृद्धी अभियान राबविल्याने ग्रामस्थांच्या विचारसरणीत नक्कीच परिणामकारक बदल होऊन गावातील प्रत्येकाचा मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि शारीरिक स्तर उंचावणार आहे.

जीवन विद्या मिशन, मुंबई या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ग्रामसमृद्धी अभियानासाठी येणारा खर्च सरकारी योजनेतून करता येणार नाही. त्यामुळे सदर खर्च जीवन विद्या मिशन, मुंबई या संस्थेने किंवा लोकवर्गणी मधून करण्यात येईल, असेही ग्रामविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील अविकसित गावे दत्तक घेऊन त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे तसेच राज्यातील गावे सर्वच बाबतीत आदर्श बनविण्याचे माझे स्वप्न असून प्रत्येक गाव अधिकाधिक सुखी, समृद्ध व सक्षम करण्यासाठी तसेच दत्तक घेतलेली गावे ही आदर्श गावे बनविण्यासाठी जीवनविद्या मिशन, मुंबई आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसमृद्धी अभियान राबविण्यात येत असल्याचे समाधान असल्याचे सांगून ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपण सर्वांनी हे ग्राम समृद्धी अभियानाचे कार्य पद्धतशीरपणे यशस्वी होण्यासाठी आणि ही सर्व उद्दिष्ट्ये साध्य करून प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यासाठी जीवनविद्या मिशन यांना ग्रामीण भागात कार्य करण्यासाठी सहकार्य करू या !

  • संजय डी.ओरके सहायक संचालक (माहिती)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या स्पर्धेत सहभाग घ्या आणि जिंका रोख पारितोषिके

Next Post

वडिल चप्पल शिवतात, आई बांगड्या विकते; आयपीएल लिलावाने या खेळाडूचे आयुष्य बदलले

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
FLtijPIaQAAznPM

वडिल चप्पल शिवतात, आई बांगड्या विकते; आयपीएल लिलावाने या खेळाडूचे आयुष्य बदलले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011