अक्षय्य तृतीया (आखाजी)
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला “आखजी” म्हणतात. खान्देशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात. अक्षयतृतीया! आखाजी.. अश्या कितीतरी नावांनी साजरा होणारा हा सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळया नावाने साजरा होतो. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तुंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणुन अक्षयतृतीयेचं विशेष महत्व समजल्या जातं.

मो. ९४२२७६५२२७
अक्षय्य तृतीया बाबत अनेक पौराणिक कथा पुराणात सांगण्यात आलेल्या आहेत. एका आख्यायिकेनुसार या दिवशी सुदामा आपला बालपणीचा मित्र भगवान श्रीकृष्णाच्या घरी गेला होता. श्रीकृष्णाच्या भेटीसाठी जाताना सुदामा त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार मूठभर पोहे घेऊन गेला होता. मात्र श्रीकृष्णाचे ऐश्वर्य पाहून त्याला त्याची भेट श्रीकृष्णाला देण्याचा संकोच वाटला. भगवान श्रीकृष्णाने दिव्य दृष्टी आणि मित्रावरील असीम प्रेमामुळे सुदाम्याच्या मनातील घालमेळ ओळखली आणि हट्ट करून सुदाम्याचे पोहे खाल्ले. शिवाय श्रीकृष्णाने आपल्या घरी आलेल्या सुदाम्याचा योग्य आदर सत्कार केला. वास्तविक सुदामा त्याच्या पत्नीच्या हट्टामुळे श्रीकृष्णाकडे आर्थिक मदत मागण्यासाठी गेला होता. मात्र श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदाम्याला इतका आनंद झाला की तो त्याची आर्थिक परिस्थिती आणि संसारातील अडचणी न सांगताच पुन्हा आपल्या घरी परतला.
घरी येताच सुदामा आश्चर्य चकित झाला कारण त्याची आर्थिक परिस्थिती अचानक बदलून त्याच्या झोपडीचे भव्य दिव्य राजवाड्यात रुपांतर झाले होते. श्रीकृष्णाच्या किमयेने सारे काही घडले होते हे सुदामाला समजले. मित्र श्रीकृष्णाच्या कृपाशिर्वादाने सुदामा श्रीमंत झाला होता. तेव्हापासून सुख, समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव करणारा हा दिवस अक्षय्य तृतीया या नावाने साजरा केला जाऊ लागला. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेला सत्य युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. यासाठीदेखील या दिवसाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाय या दिवशी नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव अशा थोर पुरुषांच्या जन्मदिवसाचा इतिहास आहे.
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे.या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.
अक्षय्य तृतीतेचे धार्मिक महत्त्व
भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. पौराणिक कथांनुसार असं सांगण्यात येतं की, या दिवशी भगवान गणेशाने आणि वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय्य तृतीयेला महत्त्व आहे.
अक्षय्य तृतीया हा दिवस भगवान विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे. परशुराम हे जमद्ग्नि आणि रेणुकादेवी यांचे पुत्र होते
अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता. अक्षय्य तृतीयेला सत्य युग संपून त्रेता युगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात.
अक्षय्य तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख, समृद्धी नांदते.
अक्षय्य तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्रय संपवले होते. त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असं म्हटलं जातं.
महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रोपदीला ‘अक्षय्य पात्र’ भेट दिले होते. ज्याला ‘द्रौपदीची थाळी’ या नावानेही ओळखले जाते. द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे. ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही. असं म्हणतात की, अक्षय्य तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती.
कुबेराकडून आराधना
अक्षय्य तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले.
जैन बांधवांमध्ये हा दिवस त्यांचे पहिले देव भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. जगन्नाथत पुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरूवात केली जाते
या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.
वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते’. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.
जैन धर्मात अक्षय्य तृतीया
भगवान वृषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते, व त्यानंतर ते एकदा ग्रहणा साठी निघाले परंतु लोकांना आहार दानाची योग्य विधी माहीत नसल्या कारणाने त्यांना अजुन पुढील सहा महिने आहार घेता आला नाही अर्थात त्यांचा वर्ष भर उपवास झाला. एकदा हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता.
आख्यायिका
अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग’ असे म्हणतात.
शेतीसंबंधी प्रथा
या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते.मातीत आळी घालणे व पेरणी : अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात.
कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते.
वृक्षारोपण :
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.
पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे
या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करणे. सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणादान. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खाणे. या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने यांची खरेदी करणे.
सोन्याचे दागिने
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.
भारताच्या विविध राज्यांत या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो.गंगा नदीमध्ये स्नान करणे,तीर्थयात्रा करणे,यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे,असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात.
ओरिसा आणि दक्षिण भारत
ओरिसात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.
दक्षिण भारतात महाविष्णू आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते.मंदिरात दर्शनाला जातात. अन्नदान करतात.
पश्चिम बंगाल मध्ये व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.
राजस्थान आणि महाराष्ट्र
राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात.. तेथे या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.
महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला “आखजी” म्हणून संबोधले जाते , खान्देशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात. साडेतिन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणुन ज्या दिवसाचं महत्व विशद केलं जातं असा हा दिवस अक्षयतृतीया! आखाजी.. अश्या कितीतरी नावांनी साजरा होणारा हा सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळया नावाने साजरा होतो. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तुंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणुन अक्षयतृतीयेचं विशेष महत्व समजल्या जातं.
अक्षय तृतीयेपासुन अनेक ठिकाणी लोक आपल्या पुर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोया सुरू करतात अनेक ठिकाणी काठोकाठ भरलेले थंड पाण्याचे रांजण आपल्याला दृष्टीस पडतात ते याच दिवसापासुन. मनुष्याच्या जीवाला त्यांच्या आत्म्याला तृप्तता देउन पुण्य कमविण्याचा हा एक प्रयत्न दिसुन येतो. निसर्ग निर्मीत पाण्याचे साठे या दिवसांमधे कमी होत असल्यामुळे धनिक मंडळी पाणपोया सुरू करीत असावेत असा देखील एक कयास बांधल्या जातो.
या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रघात आहे. मातीच्या घागरीत वाळा घालुन थंड पाणी दान दिल्यास ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं अशी समजुत आहे. थंडगार पाण्यासमवेत, कैरीचं पन्हं, वाटली डाळ, आंबा किंवा आंब्याचा रस, सातु, अश्या अनेक गोष्टींचे या दिवशी सेवन केले जाते आणि दान देखील करण्यात येतं. तसे पाहता या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवाला गारवा प्रदान करणाऱ्या आहेत आणि अक्षयतृतीया हा दिवसच मुळी भर उन्हाळयात येणारा असल्याने या गोष्टींचे सेवन करून मनुष्याला आरोग्य लाभ मिळावा हा हेतु यांतून दिसतो.
नव्या घरात गृहप्रवेश, वास्तु पुजन, नव्या व्यवसायाचा आरंभ, शुभविवाह, यांसारख्या गोष्टींकरता हा दिवस अतिशय शुभ मानल्या जातो. नवे अलंकार, सोने खरेदी केल्यास ती अक्षय होत असल्याने सोनारांच्या दुकानात या दिवशी मोठया प्रमाणात गर्दी पहायला मिळते.
अक्षय्य तृतीयेला केले जाणारे धार्मिक विधी
अक्षय्य तृतीया हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे. या दिवशी सुख समृद्धीच्या प्राप्तीसाठी अनेक धार्मिक विधी केले जातात. अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा अर्चा आणि कडक उपवास केला जातो. गोर गरिबांना अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू दान केल्या जातात. घरात भगवान विष्णूला प्रिय असलेल्या तुळशी पत्राने पाणी या दिवशी घरात शिंपडल्याने सुख शांती नांदते अशी मान्यता आहे.
धनधान्य मुबलक मिळावे यासाठी भारतात अक्षय्य तृतीयेपासून शेतीच्या कामांना सुरूवात केली जाते. व्यापारी त्याच्या आर्थिक वर्षाच्या हिशोबाची पुस्तके अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या समोर ठेवून पूजा करतात. या धार्मिक विधीला हलखता असं म्हटलं जातं.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. सोने हे ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते यासाठी या दिवशी आपल्या ऐपतीनुसार थोडे तरी सोने खरेदी केले जाते. असं केल्याने घरातील ऐश्वर्यात वाढ होते असं मानलं जातं. अक्षय्य तृतीया हा शुभ मुहूर्त असल्यामुळे आणि या दिवशी केलेल्या गोष्टी आयुष्यभर टिकतात.या दिवशी लग्नाचा पवित्र विधी केला जातो. कारण त्यामुळे असे विवाह आयुष्यभर काळ टिकतात अशी मान्यता आहे.
अक्षय्य तृतीयेला नवीन व्यवसाय, बांधकामे आणि नवीन गोष्टींना सुरुवात केली जाते. अक्षय्य तृतीयेला गंगेत स्नान करणे, यज्ञयाग करणे, दान धर्म करणे शुभ मानले जाते.
जैन बांधव या दिवशी त्यांच्या वर्षभराच्या तपस्येची सांगता उसाचा रस पिऊन करतात आणि शिवाय या दिवशी दिवसभर पूजा आराधना करतात.
आध्यात्मिक प्रवासासाठी हा दिवस शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेपासून योगसाधना करणे, ग्रंथाचे वाचन करणे, मंत्र जपास सुरूवात करणे शुभ मानले जाते. पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचे कृपार्शिवाद घेण्यासाठी अक्षय्य तृतीया शुभ मानली जाते. यासाठी पूर्वजांना या दिवशी त्यांच्या आवडीचे भोजन अर्पण केले जाते.
काही ठिकाणी हा दिवस आखा तीज म्हणूनही साजरा केला जातो. तीज च्या दिवशी सुहासिनींना सिंदूर दान केल्याने विवाहित जोडप्यामध्ये प्रेम, विश्वास वाढतो असं मानलं जातं.