शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ए, बी आणि ओ रक्तगटाचे जनक कोण आहेत माहिती आहे का? बॉम्बे ब्लड ग्रुप म्हणजे काय?

जुलै 4, 2022 | 5:09 am
in इतर
0
blood 1

 

१४ जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. ए,बी,ओ “रक्तगटाचा जनक” कार्ल लँन्डस्टेनर (Karl Landsteiner) यांचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश एवढाच की, लोकांना स्वैच्छिक रक्तदाता म्हणून रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे आणि रक्तदानाबद्दल समाजात असलेली भिती याविषयी गैरसमज दूर करणे हा आहे. एक सामान्य व्यक्ती रक्तदान करुन दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो.

ज्या रक्तदात्यांनी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी स्वैच्छिक रक्तदान केलेले असते त्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्यासाठी हा दिवस”जागतिक रक्तदाता दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. “रक्तदान” हे एकजुटीचे कार्य आहे, या प्रयत्नात सामील व्हा आणि अनेकांचे जीवन वाचवा.”! (“Donating blood is an act of solidarity Joint the efforts and save lives”) हे या वर्षाचे शासनाचे घोषवाक्य आहे

एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास आणि तिला वेळेवर रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रक्त करते. म्हणूनच वेळोवेळी ‘रक्तदात्यांना रक्तदान’ करण्याचे आवाहन केले जाते, ज्यामुळे गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतील. “रक्तदाता” हा रुग्णांसाठी नेहमी आशेचा किरण ठरला आहे. रक्त हे कृत्रिमरीत्या तयार होत नाही तर कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही. ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात.यासाठी आपण रक्तदाता म्हणून स्वतःहून स्वैच्छिक रक्तदान करणे महत्त्वाचे ठरते.

“रक्तदान हे श्रेष्ठ दान” आहे. रक्तदानामुळे आज हजारो-लाखो लोकांना जीवनदान मिळते. त्यामुळे ‘रक्तदान हे जीवनदान’, तसेच महादान”असे ही म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, आजही समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) हा कार्यक्रम सर्वप्रथम दि.14 जून 2004 रोजी “जागतिक आरोग्य संघटना,(डब्लू एच ओ) रेडक्रॉस आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसेंट सोसायटी ऑफ इंटरनेशनल फेडरेशन” च्या वतीने सुरक्षित रक्तदान करण्यासाठी जनतेत जनजागृती व्हावी, या उद्देशाने साजरा करण्यात आला.

डॉ.कार्ल लँडस्टेनर यांचे कार्य :
डॉ.कार्ल लँडस्टेनर (आँस्ट्रेलिया) यांनी रक्तातील प्रतिजन (Antigens)व प्रतिद्रव्ये(Antibodies) या प्रथिनांच्या आधारावर रक्ताचे वेगवेगळे घटक तयार केले.
इ.स.1900 साली कार्ल लँडस्टेनर (karl Landsteiner) यांनी A B O (ए,बी, ओ) लावला.तर चौथा “AB”या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली (Decastellor And Sturli) यांनी 1902 मध्ये लावला.
1909 साली पोलिओ व्हायरसचा शोध लावला.
सन 1930 साली कार्ल लँन्डस्टिनर यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपणास सर्व साधारणपणे ए, बी, एबी, ओ हे चार मुख्य गट माहीत आहेत.
त्यात आर एच (RH) म्हणजेच ऱ्हीसस या घटकामुळे निगेटीव्ह पॉझीटीव्ह असे दोन प्रकार पडले. म्हणजे ज्यामध्ये आर एच आहे ते सर्व आरएच पॉझीटीव्ह व ज्यात आर एच नाहीत ते आर एच निगेटीव्ह.

पुढे ऱ्हीसस माकडाच्या रक्तामध्ये एक घटक सापडला त्यावरुन मानवी रक्ताचा त्या घटकासाठी अभ्यास केला गेला आणि मानवी रक्तातही हा घटक सापडला त्याला आर एच नाव देण्यात आले. ऱ्हीससचे आर एच हे संक्षिप्त रुप आहे. सन 1939 मध्ये अलेक्झांडर विनर यांनी हे संशोधन केले.

‘बॉम्बे ब्लड ग्रुप”:-
ए,बी,एबी,ओ या रक्तगटानंतर 5 व्या प्रकारच्या ब्लड ग्रुपचे नाव आहे “बॉम्बे ब्लड ग्रुप!” याला Oh म्हणून देखील ओळखले जाते. या ब्लड ग्रुपचा शोध 1952 साली वाय.एम.भेंडे नावाच्या डॉक्टरांनी पूर्वीच्या बाँम्बे मध्ये अर्थात आताच्या मुंबई मध्ये लावला होता. म्हणून त्याला “बॉम्बे ब्लड ग्रुप” हे नाव पडले.जागतिक लोकसंख्येपैकी केवळ 0.0004 टक्के नागरिकांचा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ आहे. देशात याचे अंदाजे 179 लोक असून मुंबईमध्ये 35 ते 40 जण सापडतात. त्यामुळे हा रक्तगट असणा-यांनी ऑनलाइन कम्युनिटीवर रक्तगटाविषयी माहिती अपडेट करणे आवश्यक आहे. तातडीची गरज म्हणून रक्त लागल्यास bombaybloodgroup.org या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा [email protected]

“रक्तदाता” म्हणून माझे रक्तदान महत्त्वाचे का:-
माझ्या रक्तदानाने जर एखाद्या रुग्णांचे प्राण वाचणार असतील तर….त्यासाठी महत्त्वाचे.
माझ्या रक्तदानाने थँलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल,ल्युकेमिया इ. अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते. अशा रुग्णांना कधीही रक्ताची कमतरता भासू नये म्हणून माझे रक्तदान महत्त्वाचे…..!
अतिदक्षता,प्रसूती,अपघात,रक्तक्षय,अतिरक्तस्राव इ. आदी अशा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तातडीने रक्ताची आवश्यकता भासते.अशा रुग्णांसाठी माझे रक्तदान महत्त्वाचे….!

माझ्या रक्तदानाने निश्चितच गरजूंना रक्त पुरवठा झाल्याचे समाधान मिळणार..यासाठी माझे रक्तदान महत्त्वाचे.!
माझ्या रक्तदानाने…. माझ्या शरीरातील रक्तदाब,कोलेस्टेराँलचे प्रमाण योग्य नियंत्रण राहण्यासाठी…
समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते..
माझे रक्तदान… मी नेहमी शासन मान्यता प्राप्त रक्तपेढीत/रक्तकेंद्रात अथवा आयोजित स्वैच्छिक रक्तदान शिबिरात… रक्तदान करणार..हा माझा संकल्प.

बोन मँरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची क्षमता वाढते.
रक्तदान केल्यानंतर चोवीस तास ते सात दिवसात नैसर्गिकरित्या रक्ताची झीज भरून निघते.
रक्तदान केल्यानंतर नवीन पेशी तयार होण्यासाठी नव चेतना मिळते.
रक्तदान प्रक्रियेत रक्तदानाची सुरक्षितता याचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यामुळे कोणतेही इजा किंवा आजार होण्याची शक्यता नसते.

समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून निःस्वार्थीपणे, समाजहितासाठी, राष्ट्रसेवा म्हणून माझे रक्तदान महत्त्वाचे आहे.
मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्यामुळे रक्तदानाविषयी प्रेरणा समाजात द्दढ करणे, निरोगी रक्तदात्यांची फौज करून रक्तदात्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती करणे, सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदात्यांविषयी कृतज्ञता निर्माण व्हावी, या मागचा एवढाच उद्देश.

लेखन:- संपादन:-
श्री.हेमकांत सोनार रक्तपेढी तंत्रज्ञ, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग
मनोज शिवाजी सानप, जिल्हा शासकीय रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग

Article on A B O Blood group founder blood donation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परदेशी चित्रपट भारतीय भाषांमध्ये अनुवादित कसे होतात? त्यातील शीर्षके कोण लिहितात? जाणून घ्या सविस्तर…

Next Post

रेल्वे अपघातग्रस्तांच्या नुकसान भरपाईबाबत उच्च न्यायालयाने दिला हा महत्त्वाचा निर्णय

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
mumbai high court

रेल्वे अपघातग्रस्तांच्या नुकसान भरपाईबाबत उच्च न्यायालयाने दिला हा महत्त्वाचा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011