मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मृत्यूप्रकरणातील आरोपींनी त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंतर करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींनी कुठलाही तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला आहे.
नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांच्यावर बँकेने दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. खालापूर पोलिसांनी राजकुमार बन्सल यांच्यासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा यासाठी आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज याचिकेवर सुनावणी झाली असून आरोपींना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्याचबरोबर हायकोर्टाने येत्या १८ ऑगस्टपासून याप्रकरणाची सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. अटकेपासून दिलासा द्यायचा की नाही? हे पुढील सुनावणीला ठरवू, असेही हायकोर्टाने आजच्या सुनावणी सांगितले आहे.
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी निराशेतून काही दिवसांपुर्वीच आत्महत्या केली होती. त्यांनी अचानकपणे टोकाचं पाऊल उचलल्याने यावरून अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. नितीन देसाई यांच्यावर २५० कोटींचे कर्ज असल्याने तर ज्यांनी कर्ज दिले त्यांनी दबाव टाकल्यानेच देसाई यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एडलवाईसचे संचालक रासेश शाह यांनी या प्रकरणात तातडीने दिलासा मिळावा, तसेच आपल्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. आज हायकोर्टात यावर सुनावणी झाली असून कोर्टाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
यापूर्वी झाली सहा ते सात तास चौकशी
नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा यांच्या फिर्यादीवरून खालापूर पोलिसांनी कर्ज कंपनी ईसीएल फायनान्स आणि एडलवाईससह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाचही जणांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. तब्बल ६ ते ७ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी आरोपींची सुटका केली होती.
Art Director Nitin Desai Death Case Mumbai High Court
Petition Hearing Legal Bail Grant Relief Suspect Accused