इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, मुंबई सीमाशुल्क झोन ३ मधील हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली.
त्यांच्या वैयक्तिक तपासणीनंतर, या अधिकाऱ्यांनी त्यांच्या खिशातील मोज्यांत मेणामध्ये लपवलेले २४ कॅरेट सोन्याची भुकटी जप्त केली.
या जप्त केलेल्या सोन्याचे वजन ४.४ किलोग्रॅम होते, ज्याचे अस्थायी मूल्य ४.२४ कोटी रुपये आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना सीमाशुल्क कायदा १९६२ नुसार तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. या सोन्याचा स्रोत आणि यामध्ये गुंतलेल्या संघटना शोधण्यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.








