नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र-२०२५ च्या तिसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेचे संचलन ०२ ते १८ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण ५३ परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. यामध्ये ८,४२९ पेक्षा अधिक विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ठ होणार आहे.
उन्हाळी -२०२५ टप्पा-२ मधील अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर पेपर सुरु होण्याआधी यशस्वीरीत्या पाठविण्यात आलेल्या आहेत, तसेच ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करुन तपासण्याचे कार्यवाही चालू आहे. याचधर्तीवर, उन्हाळी-२०२५ टप्पा-३ व्दितीय वर्ष MBBS (Old/2019/2023) अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याबाबत परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले.
उपरोक्त अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर एक तास अगोदर म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी ०९.०० वाजता परीक्षाकेंद्रावर उपस्थित रहावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.