नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे हिवाळी-२०२४ दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय विद्याशाखेच्या व्दितीय वर्षातील ११, १३ व १९ डिसेंबर २०२४ रोजीच्या विषयांची प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारा संबंधित परीक्षाकेद्रांवर पाठविण्याचे निर्देश विद्यापीठाच्या परीक्षामंडळाने दिले आहेत.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, वैद्यकीय विद्याशाखेच्या हिवाळी-२०२४ दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षांचे प्रश्नपत्रीका लिक झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचा तपास करणेस्तव विद्यापीठ स्तरावर उच्च चौकशी समिती व संबंधित महाविद्यालयांमध्ये समिती नियुक्त करण्यात करण्यात आलेली असून चौकशीची कार्यवाही चालू आहे. तसेच पुढील शहानिशा करणेस्तव Cyber Cell अंतर्गत तसेच स्थानिक पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकाराबाबत एकसूत्रता येणेस्तव १० डिसेंबर २०२४ रोजी तातडीने मा. परीक्षामंडळाची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये, यापुढील द्वितीय वर्ष एम.बी.बी.एस. (सी.बी.एम.ई.-2019) या अभ्यासक्रमाचे म्हणजेच ११ डिसेंबर २०२४ रोजीचा Microbiology – I व १३ डिसेंबर २०२४ रोजीचा पेपर होण्याआधी ई-मेलद्वारा पाठविण्यात येणार आहे. ई-मेलमुळे प्रश्नपत्रिका पाठविण्यात येणार असल्याने अधिक वेळ वाढणार आहे याची नोंद घ्यावी. ९ डिसेंबर २०२४ (Pathology -II) रोजी दुपार सत्रामध्ये आयोजित द्वितीय वर्ष एम.बी.बी.एस. (सी.बी.एम.ई.-2019) या अभ्यासक्रमाचे पेपर सुरु होण्याआधी लिक झाल्याची बातमी विद्यापीठाला कळताच, परीक्षाकेंद्रांना उक्त विषयाच्या नवीन प्रश्नपत्रिका ई-मेल करण्यात आली व परीक्षार्थींना देण्यात आली. सदर परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तसेच पालकांना झालेल्या तसदीबद्दल विद्यापीठने दिलगीरी व्यक्त केली आहे.
विद्यापीठ हिवाळी-2024 टप्पा-2 मध्ये MBBS (OLD) -II, III (I) & III (II) year and MBBS (CBME-2019)-II year च्या परीक्षा दि. 02 डिसेंबर 2024 ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील एकूण 50 परीक्षाकेद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षाकेद्रांवर एकूण 8226 वैद्यकिय विद्यार्थ्यांपैकी 7939 विद्यार्थी द्वितीय वर्ष एम.बी.बी.एस. (सी.बी.एम.ई.-2019) या अभ्यासक्रमाचे आहेत. सदर परीक्षेदरम्यान दि. 02 डिसेंबर 2024 (Pharmacology-I)व दि. 09 डिसेंबर 2024 (Pathology-II) रोजी दुपार सत्रामध्ये आयोजित द्वितीय वर्ष एम.बी.बी.एस. (सी.बी.एम.ई.-2019) या अभ्यासक्रमाचे पेपर लिक झालेले आहेत. Microbiology-I आणि II या विषयाच्या परीक्षाकेंद्रांना देण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रीका सीलबंद अवस्थेत ठेवण्यात याव्यात व नवीन प्रश्नपत्रिका पेपर सुरु होण्याआधी ई-मेलद्वारे पाठविण्यात याव्यात असे ठरले.
हिवाळी-2024 टप्पा-2 मधील दि. 02 डिसेंबर 2024 रोजीचा Pharmacology-I या विषयाचा पेपर दुपार सत्रामध्ये पार पडला व नंतर लिक झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे, दि. 03 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या मा. परीक्षा मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उक्त दिनांकाचा पेपर दि. 19 डिसेंबर 2024 रोजी 02.00 ते 05.00 या वेळेत दुपारच्या सत्रात घेण्यात येणार असल्याचे संबंधित महाविद्यालयांना तसेच परीक्षार्थींनाही कळविण्यात आलेले आहे.