शुक्रवार, ऑक्टोबर 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रम

सप्टेंबर 27, 2024 | 5:14 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240927 WA0263 1

छत्रपती संभाजीनगर: (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी सुरु असणाऱ्या उपक्रमांचे राज्यभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणियरीत्या वाढत असल्याचे प्रतिपादन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषदचे सदस्य डॉ. विलास वांगीकर, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधीकिरण सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, छ. संभाजीनगर विभाग प्रमुख डॉ. अमित वांगीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, सेंटर ऑफ एक्सलेंसची विविध केंद्रे राज्यात सुरु करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे नेत्ररोगाच्या विषयात केंद्र निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदु आहे. विद्यापीठातर्फे ऑनलाईन लायब्ररी सुरु करण्यात आली असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. विद्यापीठातर्फे विद्यार्थी कल्याणकारी विविध योजना राबविण्यात येत असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा विद्यार्थ्यांचे मत, सूचना महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहेत त्यानुसार कार्यपध्दतीत बदल करणे शक्य होईल असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी व समस्या येतात. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा याकरीता ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रम महत्वपूर्ण आहे. महाविद्यालय स्तरावर सर्वच समस्यांचे निराकरण करणे शक्य होत नाही. विद्यार्थी व शिक्षकांच्या तक्रारी व सूचना समजून त्यांची दखल विद्यापीठाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, कुलगुरु यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेला ’कुलगुरु का कट्टा’ हा स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रमाने विद्यापीठाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी छ. संभाजीनगर विभागीय केंद्राचे विभागप्रमुख डॉ. अमित वांगीकर यांनी सांगितले की, क्लिअर व्हिजन प्रोग्रॅम सामाजिकरीत्या असक्षम घटकांसाठी अंधत्व निवारण उपक्रम असून यामध्ये बाल अंधत्व, मोतीबिंदू, काचबिंदू, थायरॉईड, अंतर्नेपटल, बाहयनेत्रपटल, काळया बुभुळावरील टीका, दूरदृष्टीदोष, अ जीवनसत्व आभाव आदी नेत्रविकारांसोबत रेटिनोब्लास्टोमा हा लहान मुलांना डोळयांचा कर्करोग त्याचे निदान आणि अल्प दरात उपचार होणार आहेत, त्यासाठी घाटी महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर यांची मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. तसेच विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी डॉ. सुनिल फुगारे, श्री. महेंद्र कोठावदे, ब्रिग. सुबोध मुळगुंद, घाटी महाविद्यालयाच्या नेत्रविभाग प्रमुख डॉ. अर्चना वरे, डॉ. कांचन देसरडा, विद्यापरीषद सदस्य डॉ. अनुपमा पाथ्रीकर, उपविभागीय अभियंता श्री. एच. के. ठाकुर, कार्यकारी अभियंता श्रीमती अनघा पुरणिक, श्री. संजय मराठे, श्री. संदीप राठोड, श्री. राजेंद्र शहाणे, श्री. बाळासाहेब पेंढारकर आदी अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री. अविनाश सोनवणे, श्रीमती मानसी हिरे, श्री. अर्जुण नागलोत यांनी परिश्रम घेतले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीवर डबलसिट प्रवास करणारा ठार

Next Post

धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या प्रीमियर शोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थित

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
2 1

धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या प्रीमियर शोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थित

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011