नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर लष्कराने राबविलेल्या मिशनमध्ये सहभागी असलेले लष्करी जवान रविंद्र भगवान वाघमारे हे तब्बल १७ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. जेलरोड परिसरातील सिद्धेश्वर नगरमध्ये त्यांचे आगमन होताच त्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आले. शाही बग्गीमधून त्यांची आणि त्यांची पत्नी पिंकी यांची मिरवणूक काढण्यात आली. बँड पथकासह असंख्य नागरिकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला.
२००५मध्ये ते लष्करात दाखल झाले होते. १७ वर्षे ३० दिवस त्यांनी सेवा बजावली. निवृत्तीवेळी ते श्रीनगर येथे तैनात होते. त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतरच्या मिशनमध्ये, अमरनाथ यात्रा सेवा ऑपरेशन, रक्षक ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. निवृत्तीनंतर घरी परतल्यावेळी शाही मिरवणुकीचे मोठे सरप्राईज देण्यात आले. त्यामुळे ते अक्षरशः भारावून गेले. परिसराचे माजी नगरसेवक शैलेश ढगे आणि प्रशांत दिवे यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले. या कार्यक्रमाचे आयोजन शांताराम दाभाडे, कॅप्टन मार्तंड दाभाडे, आणि समस्त सिद्धेश्वर नगर परिवाराने केले होते. बघा या मिरवणुकीचा व्हिडिओ
व्हिडिओ सौजन्य – सिद्धी दाभाडे
Army Jawan Welcome Miravnuk at Nashik Jail Road Salute