कोलकाता (पश्चिम बंगाल) – बांगलादेश मुक्ती संग्राम सुवर्णमहोत्सवी विजय दिनाबद्दल येथे लष्कराने स्वर्णिम विजय या समारंभाचे आयोजन केले होते. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या 1971 च्या ऐतिहासिक युद्धात भारतानं, 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानी सैन्यावर अभूतपूर्व विजय मिळविला होता. त्याचा आज सुवर्णमहोत्सव आहे. भारतीय सैन्यासमोर त्यादिवशी नव्वद हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केलं होतं. भारतीय सैन्यासाठी, तमाम देशवासियांसाठी तो गौरवक्षण अनुभवण्याचं भाग्य प्राप्त करुन देणाऱ्या देशाच्या वीर सैनिकांना, त्यांच्या शौर्याला, त्यागाला कृतज्ञतापूर्वक वंदन करण्याचा दिवस आहे. देशाच्या तत्कालिन पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या साहसी, कुशल, दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळेच तो ऐतिहासिक विजय शक्य झाला. या समारंभात लष्करी बँड पथकाने ‘ताकद वतन की हम से है’हे अप्रतिम गाणे सादर केले. बघा त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1471450025087553536?s=20