कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय सैन्यदलात ‘अग्नीपथ’ योजनेअंतर्गत १० फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी युवकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अग्नीपथ योजनेअंतर्गत नव्या पद्धतीने दोन टप्प्यात सैन्य भरती केली जाणार आहे. अग्नीवीर भरती प्रक्रिया २०२३-२४ साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी पोर्टल १० फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान खुले राहणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तर गोव्यातील दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा या जिल्ह्यातील अविवाहीत पात्र युवकांनी अर्ज करावा, असे आवाहन कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयाने केले आहे.
संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांना पाच परीक्षा केंद्र निवडावी लागणार आहेत. ऑनलाईन संयुक्त प्रवेश परीक्षा १२ एप्रिल पासून घेतली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल.
Army Agneevir Recruitment Online Registration Opportunity