पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र दलांकडून (थलसेना, नौदल, हवाईदल, भारतीय तटरक्षक दल), केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांकडून (सीएपीएफएस) तसेच राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) मार्फत देशभर विविध शहरांमध्ये वाद्यवृंद सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे, ज्यात पुण्यातील शनिवारवाडा आणि गांधी राष्ट्रीय संग्रहालयासह प्रतिष्ठित स्थळांचा समावेश आहे.
१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी होणाऱ्या या सादरीकरणांचे उद्दिष्ट स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करणे, देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणे आणि ऑपरेशन सिंदूर*च्या यशाचा उत्सव साजरा करणे हे आहे. या उपक्रमाचा हेतू नव्या पिढीला राष्ट्राच्या मूल्यांचे जतन करण्याची प्रेरणा देणे हा आहे.
महाराष्ट्रातील खालील सात प्रतिष्ठित स्थळांवर हे सादरीकरण होणार आहे:
गेटवे ऑफ इंडिया, मुंबई
शनिवारवाडा, पुणे
फ्लोरा फाउंटन, मुंबई
दीक्षा भूमि, नागपूर
गांधी राष्ट्रीय संग्रहालय, पुणे
छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), मुंबई
बँडस्टँड, बांद्रा
हा उपक्रम देशभर 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आणि 96 शहरांमध्ये राबविला जाणार असून, एकूण 142 ठिकाणी वाद्यवृंद सादरीकरण होणार आहे, ज्यामध्ये खालील दलांचा सहभाग असेल:
थलसेना (20 ठिकाणे)
नौदल (09)
हवाईदल (07)
भारतीय तटरक्षक दल (01)
एनसीसी (18
केंद्रीय राखीव पोलीस दल – सीआरपीएफ (17)
भारत-तिबेट सीमा पोलीस – आयटीबीपी (09)
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल – सीआयएसएफ (04)
सशस्त्र सीमा बल – एसएसबी (11)
सीमा सुरक्षा दल – बीएसएफ (13)
आयडीएस (01)
रेल्वे सुरक्षा दल – आरपीएफ (19)
आसाम रायफल्स (13)