मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे लग्न सानिया चांडोक हिच्याबाबत ठरल्याचे वृत्त आहे. सानिया चांडोक ही मुंबईतील उद्योगपती रवि घई यांची नात आहे. अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा एका खासगी समारंभात झाला. हा साखरपुडा दोन्ही कुटुंबाचे जवळचे लोक आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडला.
घई कुटुंबाकडे इंटरकॅान्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॅाटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी या आयस्क्रिम ब्रँडची मालकी आहे. सानिया चांडक ही डेसिगन्टेड पार्टरन आणि संचालक म्हणून Mr. Paws Pet Spa and Store LLp मध्ये कार्यरत आहे. तर अर्जुन तेंडलकरने आतापर्यंत १७ प्रथमश्रेणी, १८ लिस्ट ए आणि २४ टी २० सामने खेळले आहे.
या दोघांच्या साखरपुड्याची बातमी अधिकृतपणे दोन्ही कुटुंबियांनी दिली नाही. पण, या सोहळ्याची चर्चा मात्र चांगलीच झाली.