मुंबई – आरोग्याची निगा राखण्यासाठी स्मार्ट वॉच वापरण्याचा एक नवा ट्रेंड जगात आहे. मात्र हे स्मार्टवॉच आपल्या जीवासाठी सुरक्षित आहे का, याचा विचार आपण कधीच केला नाही. चीनमधील एका घटनेने साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे. या घटनेने स्मार्ट वॉच वापरणाऱ्यांना सतर्क केले आहे.
चीममध्ये काही दिवसांपूर्वी स्मार्ट वॉचच्या बॅटरीमध्ये ब्लास्ट झाल्याने एका मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तातडीने दवाखान्यात भरती करावे लागले. चीनमधील क्वानझोऊ शहरातील ही घटना आहे. यियी हुआंग नावाच्या मुलीचे मनगट स्मार्ट वॉचच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे जळाले. ती आपल्या भावासोबत खेळत असताना ही घटना घडली.
एका मोठ्या धमाक्याचा आवाज आल्यावर तिची आजी धावत आली. तर यियीच्या मनगटातून धूर निघत होता आणि ती जोरजोरात ओरडत होती. त्यानंतर तिला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. तिचे स्क्रीन ग्राफ्ट करावे लागले. अद्याप स्मार्ट वॉचच्या कंपनीचे नाव पुढे करण्यात आलेले नाही. पण मुलीच्या वडिलांनी भरपाईसाठी कंपनीला आवाहन केले आहे.
अलीकडेच लॉन्च झाली स्मार्टवॉच
Boat Watch Xtend ही स्मार्टवॉच अलीकडेच लॉन्च झाली. याची किंमत 3000 रुपये असून LCD 2.5D कर्व्ह्ड स्क्रीन देण्यात आले आहे. याशिवाय स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट ट्रॅकिंग, एसपीओटू मॉनिटरींग, स्लीप मॉनिटरींगसह 14 फिटनेस मोड देण्यात आले आहेत. यात योगा, वॉकिंग, रनिंग, हायकिंगसारख्या अॅक्टीव्हीटींचाही समावेश आहे. सोबतच कॉल, टेक्स्ट, अलार्म, सोशल मिडीया अॅप आदी फिचर्स दिले आहेत. सिंगल चार्जींगमध्ये 7 दिवसांचा बॅकअप या स्मार्टवॉचमध्ये मिळतो.