लंडन – आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी झोप ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आहार-विहार आणि निद्रा यांच्या सवयी आणि वेळा या चांगल्या व योग्य तर मनुष्याला कोणताही आजार होत नाही. मानवी जीवनात झोपेची अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे तसेच झोपेच्या योग्य वेळ पाळणे देखील आवश्यक आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत संशोधक प्रा. डेव्हिड प्लॅन्स म्हणतात की, शरीराचे स्वतःचे २४-तास आंतरिक घड्याळ असते. त्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात. ते शारीरिक आणि मानसिक क्रियामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी कार्य करतात. झोपेची आणि विश्रांतीची योग्य वेळ निश्चित न केल्यामुळे हे घड्याळ असंतुलित होते.
आपल्या देशात पुनीत राजकुमार आणि सिद्धार्थ शुक्ला यांसारख्या अभिनेत्यांना हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गमवावे लागले. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार हृदय निरोगी ठेवण्यासाठी झोपण्याची योग्य वेळ जाणून घेतली पाहिजे. ब्रिटनच्या एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनात रात्री १० ते११ या वेळेत झोपायला हवे, असे म्हटले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, जे नागरिक रात्री १० वाजण्यापूर्वी झोपतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. तर मध्यरात्री नंतर झोपतात त्यांना हृदयविकाराचा धोका २५ टक्के जास्त असतो. या साठी एका संशोधनात सतत १० वर्ष एक उपकरण ८८ हजार नागरिकांच्या मनगटावर बांधले गेले होते. सलग सात दिवस ते कोणत्या वेळी झोपले हे पाहण्यात आले.
पहिल्या पाच वर्षांत ३१७२ नागरिकांमध्ये हृदयाच्या समस्या आढळून आल्या. त्यांना हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, हृदयक्रिया बंद पडणे अशा समस्या होत्या. उशिरा झोपणाऱ्यांना हा धोका जास्त असतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, वेळेवर झोप न घेतल्याने, व्यक्ती सकाळच्या प्रकाशाच्या संपर्कात येऊ शकत नाही, त्यामुळे शरीराचे घड्याळ स्वतःच रीसेट होते. प्रौढांना रात्री ७ ते ९ तासांची झोप आवश्यक असते. महिला आणि मुलांना त्यापेक्षा थोडी जास्त झोप आवश्यक असते. मात्र उशिरा उठल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत जातो.