नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या ऑनलाईन प्रणाली आल्यामुळे सर्वच क्षेत्रातील कामे ही जलद होतात. ऑनलाईनमुळेच रेशन कार्डवरील अपडेट करणे आता सोपे झाले आहे. जर आपल्या रेशन कार्डवरील नाव कमी किंवा कपात झाले असेल तर घाबरू जाऊ नका. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या घरी धान्य येत असते. जर रेशन कार्डवर काही चुकी झाली किंवा काही त्रुटी निघाली का अनेकजण चिंता करतात. केंद्र सरकार तुम्हाला एक संधी देत आहे. या संधीतून आपण आपल्या रेशन कार्डवरील हवी ती माहिती अद्ययावत करु शकतो.
राज्य सरकार कडून रेशन कार्ड नागरिकांना दिले जाते. नवीन तयार झालेल्या कार्डवरील काहींची नावे ही वगळण्यात आली आहेत. ज्या व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहेत त्या व्यक्ती दावा करुन आपले नाव रेशन कार्डशी पुन्हा जोडू शकतात.
अनेक कारणांमुळे रेशनकार्डमधील नावे वगळली जातात. याचे एक कारण म्हणजे आपले नाव आधीच दुसऱ्या रेशन कार्डमध्ये असणे, आपले आधार कार्ड रेशन कार्डशी जोडलेले नसणे. समजा आपल्या घर प्रमुखाचा मृत्यू झाला असेल तर आपण नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतो. जर आपले लग्न झाले असेल आणि आपल्या पत्नीचे नाव कार्डवर दाखल करायचे असेल तर त्यासाठी एक सोपी पद्धत आहे. यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहेत.
पहिली पद्धत म्हणजे दोन्ही जण वेगवेगळे रेशन कार्ड बनवू शकतात. किंवा आधार कार्डवरील आपले नाव दुरुस्त करून रेशन कार्डमध्ये आपले नाव दाखल करु शकता. म्हणजे मुलीच्या नावात वडिलांच्या नावाच्या जागेवर नवऱ्याचे नाव लिहावे. त्यानंतर आपल्या पत्नीचे आधार कार्ड घेऊन आपण थेट तहसील कार्यालयातील खाद्य विभागातील अन्न पुरवठा विभागात जावे. आपल्याकडील आधार कार्ड त्यांना द्यावे. नाव जोडायचे आहे किंवा कपात करायचे आहे हे सांगावे.
ज्या रेशनकार्डवर आपले नाव आहे, त्यावर आपल्या पत्नीचे नाव जोडायचे आहे. तर पत्नीच्या आधार कार्डवर नावाची दुरुस्ती करावी. त्यानंतर आधार जन सुविधा केंद्रात जाऊन आपण आधार जमा करावे. ऑनलाईन पडताळणी झाल्यानंतर पत्नीचे नाव रेशन कार्डवर जोडले जाईल. आधार कार्डवरील पत्नीचे नाव बदलण्यासाठी आपल्याला लग्नाचा पुरवा लागेल. यासाठी आपण लग्नाची पत्रिका देऊ शकता. ग्रामपंचायतीमधील नोंद आपण येथे दाखवू शकता.
आपण जर रेशनकार्डधारक असाल आणि विवाहित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. रेशनकार्डमधील कुटुंबाच्या अपडेटबाबत तुम्हाला माहिती हवी. दरम्यान, कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे शिधापत्रिकेवर नोंदवली जातात. परंतु जर तुमचे लग्न झाले असेल किंवा कुटुंबात नवीन सदस्य आला असेल तर तुम्ही त्या सदस्याचे नाव देखील शिधापत्रिकेत जोडले पाहिजे. असे न केल्यास नुकसान सहन करावे लागेल.
तुम्ही विवाहित असाल तर सर्वप्रथम आधार कार्ड अपडेट करा. यासाठी महिला सदस्याच्या आधार कार्डमध्ये वडिलांऐवजी पतीचे नाव लिहावे लागेल. तसेच जर कुटुंबात मूल जन्माला आले तर त्याचे नाव जोडण्यासाठी वडिलांचे नाव आवश्यक आहे. यासोबतच पत्ताही बदलावा लागेल. आधार अपडेट झाल्यानंतर, सुधारित आधार कार्डाच्या प्रतीसह, रेशन कार्डमध्ये नाव जोडण्यासाठी अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला अर्ज द्यावा लागेल.
त्याचप्रमाणे वर नमूद केलेल्या आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अन्न पुरवठा कार्यालयात जा आणि अर्ज सबमिट करा. तसेच तुम्ही घरी बसूनही नवीन सदस्यांची नावे जोडण्यासाठी अर्ज करु शकता. यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. जर तुमच्या राज्यात सदस्यांची नावे ऑनलाइन जोडण्याची सुविधा असेल तर तुम्ही हे काम घरी बसून करु शकता.
अनेक राज्यांनी पोर्टलवर ही सुविधा दिली आहे, तर अनेक राज्यांमध्ये ही सुविधा सुरु झालेली नाही.रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव टाकायचे असेल तर आधी त्याचे आधार कार्ड काढावे लागेल. यासाठी तुम्हाला मुलाचे जन्म प्रमाणपत्र देखील आवश्यक असेल. यानंतर, आधार कार्डसह, तुम्ही रेशन कार्डमध्ये मुलाचे नाव नोंदवण्यासाठी अर्ज करु शकता.
Are You Married Do Changes in Ration Card Urgently