मुंबई – आजच्या काळात अनेक तरुणांना नोकरी व्यवसाया निमित्त परदेशात जाण्याची इच्छा असते. परंतु कोणत्या देशातील कोणत्या शहरात आपल्याला सुरक्षित वाटेल, याची मात्र त्यांना फारशी माहिती नसते. कारण परदेशात जाणे म्हणजे आपल्या आप्तस्वकीय आणि नातेवाईकांना पासून लांब जाणे होई. सहाजिकच यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. तसेच परदेशातील सामाजिक वातावरण कसे आहे, याचीही आपल्याला माहिती माहिती नसते. परंतु जगातील काही शहरे मात्र सर्वांसाठी सुरक्षित आहेत असे दिसून येते. परदेशात स्थायिक व्हायचे असेल तर आशिया खंडातील दोन शहरे या बाबतीत आघाडीवर आहेत. यामध्ये मलेशियाची राजधानी क्वालालंपूर आणि दुबईचा समावेश आहे.
या शहरांची रँकिंग उत्कृष्ट
इंटरनेशन्सच्या एक्सपॅट सिटी रँकिंग 2021 मध्ये, क्वालालम्पूर पहिल्या क्रमांकावर आहे तर दुबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मलागा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेटिंग सेटल इंडेक्समध्ये या शहरांची रँकिंग उत्कृष्ट आहे. या यादीनुसार, इतर देशांत राहणारे प्रवासी या शहरांमध्ये घरीच वाटतात आणि त्यांना येथे मित्र बनवायला काहीच हरकत किंवा अडचण नाही.
येथे राहणे सुरक्षित
दुबई आणि मालागा येथे राहणे चांगले, तर क्वालालंपूर आणि मालागा येथे राहणे दुबईपेक्षा स्वस्त आहे. दुसरीकडे, सर्वात वाईट शहरांमध्ये रोम, मिलान आणि जोहान्सबर्गचा समावेश आहे. अर्बन वर्क लाईफ इंडेक्समध्ये त्यांची रँकिंग वाईट आहे. येथील राहणीमानाचा दर्जाही निकृष्ट आहे.
यादी कशी तयार झाली?
एक्सपॅट सिटी रँकिंग आंतरराष्ट्रीय लोकांनी एका सर्वेक्षणाद्वारे तयार केले आहे. परदेशात राहणे आणि स्थायिक होणे यावर लक्ष केंद्रित केले. यामध्ये 6 पैलूंचा समावेश आहे. गेटिंग सेटल इंडेक्समध्ये सुमारे 6 पैलू समाविष्ट आहेत. यामध्ये राहणीमानाच्या किंमतीपासून ते उपजीविका, कामाचे वातावरण आणि शहरातील गुणवत्ता या श्रेणींचा समावेश आहे.
1 शहरी गुणवत्ता, 2 जगणे, 3 सेटल होणे, 4 शहरी कार्यशैली व जीवनशैली, 5 वित्त आणि गृहनिर्माण व्यवस्था,6 राहण्यासाठीची घरांची व अन्य स्थानिक किंमत, 7 सर्वोत्तम शहर
मैत्रीपूर्ण वर्तनाचेही कौतुक
क्वालालंपूरमधील ७५ टक्के प्रवासी घरी वाटतात. स्थानिक लोकांच्या मैत्रीपूर्ण वर्तनाचेही बहुतेकांनी कौतुक केले. मलागा हे मित्र बनवण्यासाठी सर्वोत्तम शहर आहे. दुबई महाग असले तरी तिथे स्थायिक होणे सोपे आहे.
सर्वात वाईट शहर
या यादीत रोम हे जगभरातील प्रवासी लोकांसाठी सर्वात वाईट शहर असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मिलानने त्याची निराशा केली आहे. जोहान्सबर्गबद्दल बोलायचे झाले तर सुरक्षा, काम आणि आर्थिक समस्या आहे.