पुणे – आपल्याकडे स्वतःची कार असावी, असे आजच्या काळात बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी तसेच नोकरदार वर्गाला वाटते. त्याचप्रमाणे व्यवसायिक असो की व्यापारी किंवा एखादा श्रीमंत शेतकरी त्यालाही स्वतःची कार असावी अशी अपेक्षा असते. त्याचप्रमाणे सध्या तरुण नोकरदार वर्गांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. परंतु कार खरेदी करताना तिचे फायदे तोटे बघणे आवश्यक असते. मारुती वॅगन आर ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ग्राहकांना ती फॅमिली कार म्हणून आवडते. पण या कारचा सर्वात मोठा दोष समजून घेणे आवश्यक आहे. कोणीही वॅगन आर खरेदी करणार असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्याआधी, मारुती सुझुकी वॅगनर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे.
सर्वाधिक युनिट्सची विक्री
गेल्या महिन्यात, या हॅचबॅकच्या 16,853 युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत 3.67 टक्क्यांनी वाढली आहे. तर नोव्हेंबर 2021 मध्ये WagonR ने 16,256 युनिट्सची विक्री केली.
तोटे
एवढी विक्री असूनही या कारमधील सर्वात मोठी कमतरता म्हणजे तिची सुरक्षा होय. 2019 मध्ये ग्लोबल NCAP द्वारे मारुती WagonR ची क्रॅश चाचणी घेण्यात आली. कारला प्रौढ सुरक्षेसाठी फक्त 2 स्टार रेटिंग मिळाले, तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी देखील फक्त 2 स्टार मिळाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कार अधिक पॉवरफुल असणे आवश्यक आहे.
किंमत
मारुती वॅगनरची सीएनजी प्रकार खूप लोकप्रिय आहे. WagonR CNG चे मायलेज 32.52 किमी प्रति लिटर पर्यंत आहे. मारुती वॅगनर भारतात 4.93 लाख ते 6.45 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) मध्ये खरेदी केली जाऊ शकते. WagonR च्या पेट्रोल प्रकारांचे मायलेज 21.79 kmpl पर्यंत आहे. हे LXi, VXi आणि ZXi या 3 ट्रिम स्तरांवर 14 प्रकारांमध्ये येते. ग्लोबल NCAP सेफ्टी टेस्टमध्ये याला 2 स्टार रेटिंग मिळाले आहे.
वैशिष्ट्ये
नवीन मारुती सुझुकी वॅगनर मध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, पॉवर्ड ORVM, स्प्लिट फोल्डिंग रिअर बेंच, ड्युअल एअरबॅग्ज, पॉवर स्टीयरिंग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, पॅसेंजर एअरबॅग अशी वैशिष्ट्ये आहेत.