नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात चक्कर येवून पडल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षीही अनेकांचा यामुळे मृत्यू झाला होता. तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध भागात चक्कर येऊन मृत्यू होणाऱ्यांची नोंद पोलिस स्टेशनमध्ये होत आहे. त्यामुळे तुम्हालाही चक्कर येत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींची नाशिक शहरात पंचवटी आणि उपगनर पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी (१४ जुलै) नोंद करण्यात आली आहे.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानवाडीतील रणजित रामअवतार राम (५० रा.येशू व्हिला अपा.) हे गुरूवारी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात चक्कर येवून पडले होते. कुटूंबियांनी तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ.राहूल पाटील यांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, अधिक तपास पोलिस नाईक कोरडे करीत आहेत.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समतानगर भागात एक घटना घडली आबे. कॅनोलरोडवरील विजय केरू खराटे (४५ रा.आम्रपाली नगर) हे गुरूवारी सायंकाळच्या सुमारास समतानगर येथील सार्वजनिक शौचालय भागातून पायी जात होते. त्यावेळी ते अचानक चक्कर येवून पडले होते. मित्र परमेश्वर म्हस्के यांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शहाणे करीत आहेत.
Are you Feeling Dizzy don’t neglect two peoples death in Nashik Crime