नाशिक – आपल्या अनोख्या स्थापत्य प्रकल्पांमुळे ख्यात असलेल्या आर्किटेक्ट सचिन गुळवे यांना नुकतेच गोवा येथे ‘नॅशनल बिझनेस अँड सर्व्हिस लिडरशीप अवार्ड- २०२१’ आणि पश्चिम विभागासाठी ‘द बेस्ट इंडस्ट्रीअल आर्किटेक्चर सर्व्हिस प्रोव्हायडर’ म्हणून गौरविण्यात आले. यानिमित्ताने राष्ट्रिय पातळीवर नाशिकचा लौकिक उंचावला आहे.
स्थापत्यक्षेत्रातील कामांचे सातत्य, वैविध्य आणि दर्जा या कसोट्यांवर छाननी करून हा पुरस्कार दिला जातो. औद्योगिक आणि आदरातिथ्य प्रकल्पांच्या उभारणीत प्राविण्य असलेल्या आर्कि. गुळवे यांनी गेल्या अठरा वर्षांच्या वाटचालीत दोनदा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. त्यांच्या गुळवे आर्किटेक्टस या संस्थेचा पर्यावरणपूरक, नाविण्यपूर्ण प्रकल्प उभारण्यावर भर असतो. आर्कि. गुळवे हे नाशिक सिटीझन्स फोरमचे पदाधिकारी असून शहर विकासासाठीच्या संकल्पना विकसीत करण्यासाठी ते सक्रिय योगदान देत असतात.