नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात अनेक मोठे बदल झाले आहेत. कुठे शिक्षणाची पद्धत बदलली आहे. तर कुठे अभ्याक्रमात फेरफार झाले आहेत. प्रवेशप्रक्रीयेमध्ये गोंधळ तर आता कायम होतांना दिसतो. अशा बदलांमुळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक यांना मात्र मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. अशाच गोंधळाची स्थिती आर्कीटेक्ट, डिझाईन आणि इंटीरियर डिजाइन क्षेत्रात ही पाहायला मिळते. यातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आयडीया कॉलेजने नेहमीच पुढाकार घेतला आहे.
यंदाही हीच परंपरा कायम ठेवत या क्षेत्रातली प्रवेश प्रक्रिया, रोजगाराच्या संधी आणि होत असलेले बदल यावर सखोल चर्चा आणि मार्गदशन करण्यासाठी आर्कि. प्रा. अभय पुरोहित हे कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर चे अध्यक्ष यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या. २७ मे ला संध्याकाळी ५ वाजता कुर्तकोटी शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड, नाशिक ला सदरचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ही मुलाखत आर्कि. प्रा. विजय सोहनी, संचालक आयडीया कॉलेज घेणार आहेत. मुलाखतीच्या शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांना पुरोहित यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे.
प्रा. पुरोहित आर्किटेक्चर कौन्सिल चे अध्यक्ष आहेत. आर्किटेक्चर कौन्सिल ही देशातील आघाडीची कार्यकारिणी आहे, जी वास्तुकलेचे शिक्षण आणि व्यवसायाच्या विनियमनासाठी कार्यरत असते. या निमित्ताने आर्कीटेक्ट, डिझाईन आणि इंटीरियर डिजाइन क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षाशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. Institute of Design Education & Architectural Studies, Nagpur चे प्राचार्य आणि संचालक आहेत. आर्किटेक्चर कौन्सिलमध्ये 25 वर्षांचा मोठा अनुभव आहे आणि त्यांनी शिक्षण आणि व्यावसायिक सुधारणांशी संबंधित अनेक समित्यांवर काम केले आहे. विद्यापीठांसाठी यूजीसी तपासणी समितीवर त्यांनी सीओएचे प्रतिनिधित्व केले.
विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर अर्थात ‘आयडिया कॉलेज’ गेल्या १३ वर्षांपासून शहरात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकविण्याचा कॉलेजचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांचा कॉलेज सोबतचा संवाद वाढण्यासाठी दरवर्षी डिझाईन डायलॉग कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत सदरच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन आयडीया कॉलेज, इंस्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स (IIID), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ आर्कीटेक्ट आणि आर्कीटेक्ट अॅण्ड इंजिनियर्स असोसिएशन यांनी एकत्रिरित्या आयोजन केले आहे. या क्षेत्रात प्रवेश घेऊन पाहणारे विद्यार्थी, त्यांचे पालक यांना या कार्यक्रमाचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांनी या संधीचा अवश्य फायदा घ्यावा असे आवाहन आयडीया कॉलेजने केले आहे.
असा आहे दुर्मिळ योग
या मुलाखतीच्या निमित्ताने एक अनोखा योग जुळून आला आहे. ही मुलाखत आजी माजी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मधली ठरणार आहे. मुलाखत घेणारे प्रा. विजय सोहनी यांनी तीन वेळा आर्किटेक्चर कौन्सिलचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे मुलाखत घेणारे माजी अध्यक्ष असतील तर मुलाखतीला उत्तर देणारे विद्यमान अध्यक्ष आहेत.
Architect Council President Nashik Visit