नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेमार्फत २०२३ चा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले तेजस्विनी पुरस्कार नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्या व महसूलच्या कर्मचारी अर्चना देवरे यांना पवार लॅान्स नाशिक या ठीकाणी समितीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे देण्यात आला.
या प्रसंगी रिपाइं राष्ट्रीय उपाध्यक्षा शिलाताई गांगुर्डे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सुवर्णाताई डंबाळे, योगगुरु प्रज्ञा पाटील, इंटरनॅशनल मिस शिल्पी आवस्थी, समितीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रो.प्रेमलताताई जाधव, प्रदेश संघटक व तृतीयपंथी आखाड्याचे महामंडलेश्वर शिवलक्ष्मी झाल्टे, सिनेअभिनेत्री सविता चतुर, मानवसावा वृध्दाश्रम संचालीका ललीता नवसागर, महिला बालकल्याण स.आयुक्त सरस्वती बागुल, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा शोभा नगराळे यासह मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारात अर्चना देवरे यांना सन्मानपत्र स्मृतीचिन्ह शाल फेटा गुलाबपुष्प सावित्रीमाईचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल अर्चना देवरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.