नाशिक – श्री साई बहुउद्देशीय संस्थेतर्फे शैफाली भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रीय सावित्री गौरव पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या अर्चना देवरे यांना देण्यात आला. शासकीय कामाबरोबरच उत्कृष्ट गायिका, लेखिका, कवयित्री व समाजिक कामात सुध्दा सहभाग घेऊन वेगळा ठसा उमटवल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला. रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आमदार प्रा. देवयानी फरांदे , राष्ट्रवादी कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, महानगरपालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते,शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, शिवाजी ढेपले, पोलिस अधिकारी संगीत निकम, कविता कर्डक, संगीता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.