अतिखोल अरबी समुद्रातील
अति तीव्र चक्रीवादळ
सध्या उत्तर केरळातील कालिकत शहराच्या समोर पश्चिमकडे खोल अरबी समुद्रात आज सकाळी असलेले अतितीव्र हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आज संध्याकाळी जवळपास मंगळूरू शहराच्या समोर पश्चिमकडे खोल अरबी समुद्रात चक्रीवादळात त्याचे रूपांतर होण्याची शक्यता जाणवत आहे. सदर चक्रीवादळाचे यादीत अनुक्रमाने उपलब्ध असणारे व बांगलादेशाने सुचवलेल्या त्यांच्या बंगाली भाषेतील नांव ‘बीपॉरजॉय’ असेल व त्याचा मराठीत अर्थ ‘आपत्ती’ हा होय.
सदर चक्रीवादळाचे येत्या ३ ते ४ दिवसात अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होवून साधारण ६ दिवसानंतर रविवार दि.११ जून दरम्यान मुंबई शहर ते ओमान देशाच्या ‘काल बन’ व ‘दावाह’ बेटांच्या दरम्यान सरळ जोडणाऱ्या अंतराच्या मध्यावर खोल अरबी समुद्रात त्याचे ठिकाण असुन त्यावेळी त्याचा झटक्याखाली वाऱ्याचा वेग हा ताशी १५० ते १७० किमी. असु शकतो.
सदर वादळ अतिखोल अरबी समुद्रात असल्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेष नुकसानदेही परिणाम होण्याची शक्यता कमीच वाटते. तर अजुन देशाच्या भू-भागावर प्रवेश न पावलेला मोसमी पावसाच्या आगमनावर काय परिणाम होवु शकतो, ह्या बद्दलचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Arabian Sea Cyclone Weather