नाशिक – नाशिक महानगरपालिकेने शहरातील १४ खासगी रुग्णालयाला लसीकरण करण्यासाठी मान्यता दिली आहे. यात अटी व सुचनाही केल्या आहे. सध्या लस उपलब्ध नसली तरी तयारी म्हणून ही मान्यता दिली आहे. व्हॅक्सीन उपलब्धतेबाबत मात्र महानगरपालिका कोणतीही जबाबदारी स्विकारणार नाही असेही ही मान्यता देतांना म्हटले आहे. त्यामुळे ही व्हॅक्सीन हॅास्पिटल कोठून उपलब्ध करुन घेतील हा प्रश्न कायम आहे. १८ वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरण करणेबाबत शासनाने सुचित केलेले आहे. त्यामुळे पूर्वतयारी म्हणून ही मान्यता दिली आहे.