मुंबई – अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने २०० पेक्षा जास्त जीवन-रक्षक किडनी ट्रान्सप्लांट्स तीन वर्षात यशस्वीपणे पूर्ण करून आपल्या रीनल ट्रान्सप्लांट्स प्रोग्रॅममध्ये एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कोविड महामारीच्या आव्हानात्मक काळात करण्यात आलेल्या किडनी ट्रान्सप्लांट्सचा देखील यामध्ये समावेश असल्याने हे यश अधिक जास्त कौतुकास्पद आहे. त्यांच्या उच्च क्षमता व रोबोटिक तंत्रज्ञानाचा सहयोग लाभलेल्या नेफ्रॉलॉजीमध्ये अवयव-विशेष कार्यक्षेत्रातील ज्ञान दर्शवतात. किडनी ट्रान्सप्लांट्सचा यशस्वी होण्याचा दर ९९ टक्के पेक्षा जास्त आहे आणि गुंतागुंतीची ट्रान्सप्लांट्स देखील यशस्वीपणे केली गेली आहेत, ज्यामध्ये एबीओ-इन्कॉम्पॅटिबल (मिसमॅच ब्लड ग्रुप) ट्रान्सप्लांट्स आणि रिपीट (दुसऱ्यांदा) ट्रान्सप्लांट केसेस चा देखील समावेश आहे.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे कन्सल्टन्ट रोबोटिक युरॉलॉजिस्ट आणि रीनल ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. अमोलकुमार पाटील यांनी सांगितले, “अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये सर्जिकल तंत्रज्ञानाचे सतत अपग्रेडेशन केले जाते, आजच्या काळात कमीत कमी इन्व्हेसिव्ह तंत्र सर्वात जास्त वापरली जातात. यामुळे सर्जरीनंतर होणाऱ्या वेदना कमी होतात. द विंची सर्जिकल सिस्टिमसारख्या आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानासह अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये रुग्णांवर केले जाणारे उपचार आणि त्यांच्या परिणामांचे असे पर्याय उपलब्ध आहेत जे जगातील सर्वोत्कृष्ट पर्यायांच्या तोडीचे आहेत.
आज भारतामध्ये किडनीच्या आजारामध्ये सातत्याने वाढ होत आहे, एकूण रुग्णांपैकी १७ टक्के पेक्षा रुग्ण हे किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. जेव्हा आजार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये असतो तेव्हा त्याचे प्रारंभिक निदान, योग्य उपचार आणि औषधांसह आजार वाढण्यापासून रोखणे किंवा त्याचा वेग मंदावण्यामध्ये मदत मिळू शकते. पण त्याच्या पुढील तिसऱ्या टप्प्यामध्ये नियमित हेमोडायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट अशी किडनी रिप्लेसमेंट थेरपी आवश्यक ठरते. हेमोडायलिसिसचे दुष्परिणाम होतात आणि यामुळे रुग्णाचे स्वातंत्र्य व जीवनाची गुणवत्ता यावर मर्यादा येतात. किडनी ट्रान्सप्लांट हा शेवटच्या टप्प्यातील किडनी आजार असलेल्या रुग्णांवरील उपचारांचा एक लोकप्रिय पर्याय आहे.